Source :- ZEE NEWS
Baba Vanga Predictions 2025 : 2025 ची सुरुवात महाभयंकर असेल अशी भविष्यवाणी बाबा वेंगा याने केली होती. 2025 या वर्षासाठी बाबा वेंगाने केलेल्या 3 भविष्यवाण्या चार महिन्यात खऱ्या ठरल्या आहेत. कोणत्याही क्षणी बाबा वेंगाची चौथी भविष्यवाणी खरी ठरु शकते. संपूर्ण जग ज्याच्या शोधात आहे तोच हा शोध आहे. जाणून घेऊया बाबा वेंगाची ही चौैथी भविष्यवाणी नेमकी काय आहे.
बाबा वेंगाची पहिली भविष्यवाणी 2025 वर्ष सुरु होण्याआधीच खरी ठरली होती. 2025 वर्ष सुरु होण्याच्य 13 दिवस आधीच म्हणजेच 18 डिसेंबर 2024 रोजी बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली. कर्करोगावरील लस जगासमोर आली. रशियाने वैज्ञानिक शास्त्रातील चमत्कार करुन दाखवला आहे. रशियाने कर्करोगावरील लस विकसित केली आहे. 18 डिसेंबर 2024 रोजी रशियाने याची घोषणा केली. ही लस कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी असणार आहे. यानंतर दुसरी भविष्यवाणी होती ती मोठ्या नैसर्गिक आपत्तीची. म्यानमार आणि भूतानमध्ये महाविनशाकारी भूकंप झाला. जगावर आर्थिक युद्ध होईल अशी तिसरी भविष्यवाणी होती. ही देखील भविष्यवाणी खरी ठरलेय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलला पत्रकार परिषद घेत टॅरिफ धोरण जाहीर केले. यामुळे जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होत आहे. यानंतर बाबा वेंगाची चौथी भविष्यवाणी आहे ती एलियनबाबातची. 2025 मध्ये पृथ्वीवर अपरिचीत प्राणी दिसतील. 2025 मध्ये एलियन पहिल्यांदाच मानवांशी थेट संपर्क साधतील अशी भविष्यवाणी बाबा वेंगाने केली आहे.
बाबा वेगांची चौथी भविष्यवाणी खरी ठरु शकते. NASA ला पृथ्वीसारखा दिसणारा ग्रह सापडला आहे. नासाच्या वेब टेलिस्कोपने K2-18B हा एक्सोप्लॅनेट शोधला आहे. एक्सोप्लॅनेट K2-18B सध्याच्या पृथ्वीपेक्षा 8.6 पट मोठा आहे. या ग्रहाच्या वातावरणात मिथेन वायू आणि कार्बन डायऑक्साईडशी संबंधित रेणूही सापडले आहेत. या ग्रहावर मोठ्या प्रमाणात हायड्रोजन असल्याने याला हायसेन प्लॅनेट असेही म्हंटले जात आहे. K2-18B हा एक्सोप्लॅनेट पृथ्वीपासून 120 प्रकाशवर्षे दूर आहे. K2-18B या एक्सोप्लॅनेटचा आकार जवळजवळ पृथ्वी आणि नेपच्यूनच्या आकाराएवढा आहे. हा ग्रह सौरमालेतील इतर ग्रहांपेक्षा वेगळा आहे.
संशोधनादरम्यान खगोलशास्त्रज्ञांना या ग्रहावर मिथेन, अमोनियासह इतर वायू आणि रसायने सापडली आहेत, परंतु ही रसायने तुलनेने कमी प्रमाणात आहेत. परंतु हे वायू जैविक प्रक्रियेच्या कार्यात कितपत उपयुक्त ठरतील हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, येथे मोठ्या प्रमाणात हायड्रोजन आहे. या ग्रहावर पाण्याचे महासागर आहेत. यामुळे येथे जीवसृष्टी अस्तित्वात असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
SOURCE : ZEE NEWS