Home world news marathi 5 रुपयांच्या पार्ले-जी बिस्किटाची ‘या’ देशात तब्बल 2400 रुपयांत सुरु आहे विक्री;...

5 रुपयांच्या पार्ले-जी बिस्किटाची ‘या’ देशात तब्बल 2400 रुपयांत सुरु आहे विक्री; एका बापाची पोस्ट व्हायरल

4
0

Source :- ZEE NEWS

भारतामध्ये पार्ले-जी बिस्किट अनेक घरांमध्ये नित्याने खाल्लं जातं. काहींसाठी तर रोज सकाळी चहासोबत पार्ले-जी बिस्किट खाणं हा दैनंदिनीचा भाग आहे. स्वस्तात उपलब्ध असणारं हे बिस्किट सर्वसामान्यांचं बिस्कीट म्हणून प्रसिद्धीस आलं. कोणालाही परवडेल इतक्या पैशात हे बिस्किट उपलब्ध होतं. मात्र युद्धाच्या गर्तेत अडकलेल्या गाझामघ्ये हे बिस्किट 500 पट जास्त किमतीला विकलं जात आहे. 

गाझामधील एका पित्याने सोशल मीडियावर केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्याने दावा केला आहे की, मुंबईतील मुख्यालय असलेल्या पारले प्रोडक्ट्सद्वारे उत्पादित पार्ले-जी बिस्किटं २४ युरो (2342रुपये) पेक्षा जास्त किमतीत विकली जात आहेत. भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त बिस्किट अशी ओळख असणाऱ्या बिस्किटाची ही किंमत वाचून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. 

“बऱ्याच प्रतीक्षेनंतर, आज मला अखेर रविफसाठी तिचे आवडते बिस्किट मिळाले. किंमत 1.5 युरोवरून 24 युरो झाली असली तरी, मी रविफला तिचा आवडता पदार्थ नाकारू शकलो नाही,” असं मोहम्मद जवाद नावाच्या या व्यक्तीने लिहिलं आहे. 

गाझाला युद्धाचा मोठा फटका बसला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आणि त्यानंतर लगेचच सुरू झालेल्या इस्रायलच्या लष्करी मोहिमेनंतर, गाझामध्ये अन्नाचा तुटवडा निर्माण झाला आहे. या वर्षी 2 मार्च ते 19 मे दरम्यान, वेढलेल्या पॅलेस्टिनी एन्क्लेव्हला जवळजवळ नाकेबंदीचा सामना करावा लागला. केवळ मर्यादित संख्येत मानवतावादी ट्रकनाच जाण्याची परवानगी देण्यात आली, त्यापैकी बहुतेकांना तीव्र आंतरराष्ट्रीय दबावानंतर परवानगी देण्यात आली.

दरम्यान गाझामधील महागाई फक्त पार्ले-जीपुरती मर्यादित नाही. “समस्या मूळ पुरवठादारांची किंवा कर आकारणीची नाही,” असं गाझा शहरातील 31 वर्षीय सर्जन डॉ. खालेद अलशवा यांनी सांगितलं. “हे सामान सहसा गाझामध्ये मानवतावादी मदत म्हणून मोफत येतं. पण ही मदत काही मोजक्या लोकांनाच मिळते. अन्नाची टंचाई असल्याने ते काळ्या बाजारातील महागड्या वस्तूंमध्ये रुपांतरित होतात”.

गाझात महागाई इतकी आहे की, एक किलो साखरेसाठी 4914, एक लिटर खाद्यतेलासाठी 4177, एक किलो बटाट्यांसाठी 1965, एक किलो कांद्यासाठी 4423 आणि एक कॉफी कपसाठी 1800 रुपये मोजावे लागत आहेत. 

अलशवा यांनी पार्ले-जी बिस्किटांचं एक पॅकेट मिळवलं, ज्यासाठी त्यांना 240 रुपये मोजावे लागले. वेगवेगळ्या ठिकाणी, विक्रेता कोण आहे यावर किंमती अवलंबून असल्याचं ते सांगतात. 

“तीन महिन्यांहून अधिक काळ सीमा बंद आहेत. यामुळे 20 लाख लोकांच्या गरजा अल्पशा प्रमाणात पूर्ण झाल्या आहेत. म्हणून जेव्हा काही लोकांना काहीतरी मिळतं किंवा जेव्हा लूटमार होते तेव्हा हे अन्न खूप जास्त, न परवडणाऱ्या किमतीत विकले जात आहे.” असं डॉ. अलशवा यांनी सांगितलं.

पार्ले-जी कदाचित मदत शिपमेंटद्वारे पोहोचले असेल, आणि अखेर काही विक्रेत्यांच्या हाती लागले ज्यांनी ते बहुतेक गाझावासीयांना महाग किंमतीत विकंल. अगम्य किमतीत विकलं.

SOURCE : ZEE NEWS