Source :- ZEE NEWS
Two Hundred Year Old Condom: जगभरात अशा अनेक वस्तू सापडतात. ज्या प्राचीन आणि फारच आश्चर्यकारक असतात. या प्राचीन वस्तूंची किंमतदेखील लाखमोलाची असते. अशातच एक अशी वस्तू सापडली आहे जे ऐकून तुम्हालादेखील आश्चर्य वाटलं असेल. एका संग्रहालयामध्ये एक कंडोम खूप अँटिक पीस म्हणून संग्रहालयात ठेवण्यात आलेले आहे. या कंडोमची खासियत म्हणजे 200 वर्षांपूर्वी हे बनवण्यात आहे. हे जगातील सर्वात जुने कंडोम आहे. सध्या सोशल मीडियावर याचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.
हे अनोखे आणि जुने कंडोम नेदरलँडमध्ये असलेल्या एम्स्टर्डममधील रिजिक्स संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. येथे नेहमीच पर्यटकांची भरपूर गर्दी असते. मिळालेल्या माहितीनुसार, हे कंडोम 1803मध्ये बनवण्यात आले होते. तसंच, हे बनवण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्यांचीदेखील खूप चर्चा होते. लोक हे संग्राहलयातील सगळ्यात महागडी आणि अनोखी गोष्ट असल्याचे म्हणतात.
हे कंडोम जवळपास 200 वर्षांपूर्वी मेंढीच्या आतड्यांपासून तयार करण्यात आले होते. प्राण्यांच्या आतड्यांपासून बनवण्यात आलेले जगात दोनच कंडोम आहेत. त्यानंतर साधारणपणे सगळ्यात रबरचा वापर होऊ लागला. या कंडोमच्यावर एकाप्रकारचे आर्टदेखील बनवण्यात आले आहे. यात काही पुरूष हे एका महिलेसमोर उभे असल्याचे दिसत आहे.
आता तुम्ही विचार कराल एका कंडोमची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते. साधारणपणे 10 किंवा 25 हजार. पण तुमचा हा तर्क चुकला आहे. या कंडोमची किंमत 98 लाख रुपये इतकी आहे. एम्स्टर्डम संग्राहलयाने हे कंडोम तब्बल 98 लाख रुपये मोजून खरेदी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंडोम या संग्रहालयात या वर्षीच्या नोव्हेंबरपर्यंतच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तिथून ते कुठे जाणार या बाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही.
SOURCE : ZEE NEWS