Home world news marathi 20 वर्षांपासून कोमात असलेला सौदी अरेबियाचा ‘स्लीपिंग प्रिंस’ शुद्धीवर आला? अब्जाधीश राजकुमाराची...

20 वर्षांपासून कोमात असलेला सौदी अरेबियाचा ‘स्लीपिंग प्रिंस’ शुद्धीवर आला? अब्जाधीश राजकुमाराची भयानक कहाणी

6
0

Source :- ZEE NEWS

Saudi Sleeping Prince Wakes Up : साऊदी अरेबियाच्या राजघराण्यातील सदस्य प्रिन्स अल-वलीद बिन खालिद बिन तलाल… या  अब्जाधीश राजकुमाराची कहानी खूपच भयानक आहे. 20 वर्षांपासून  कोमात असलेला  प्रिन्स अल-वलीद शुद्धीवर आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यावर प्रिन्स अल-वलीद यांचे पिता प्रिन्स खालिद बिन तलाल यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. प्रिन्स अल-वलीद हे ‘स्लीपिंग प्रिंस’ म्हणून ओळखले जातात. 

18 एप्रिल 2025 रोजी प्रिन्स अल-वालिद यांचा 36 वा वाढदिवस साजरा झाला. प्रिन्स अल-वालिद यांच्याबबात  गेल्या अनेक वर्षांपासून  कोणतीही माहिती नाही. पण ते ‘स्लीपिंग प्रिन्स’ म्हणून प्रसिद्ध आहेत. याचे कारण म्हणजे ते 20 वर्षांपासून कोमात आहेत?.  एका धोकादायक अपघातामुळे प्रिन्स अल-वालिद यांचे आयुष्य उद्धवस्त झाले. 20 वर्षांपूर्वी 2005 एका भयानक अपघातात प्रिन्स अल-वालिद यांना गंभीर दुखापत झाली. तेव्हापासून म्हणजेच 20 वर्षांपासून प्रिन्स अल-वालिद कोमात आहेत. अपघात झाला तेव्हा ते एका लष्करी महाविद्यालयात शिक्षण घेत होते.

प्रिन्स अल-वलीद हे साऊदी अरेबियाचे संस्थापक राजा अब्दुलअजीज यांचे पणतू आहेत. त्यांचे वडील प्रिन्स खालिद बिन तलाल हे राजा अब्दुलअजीज यांचे पुत्र प्रिन्स तलाल बिन अब्दुलअजीज यांचे पुत्र आहेत.  प्रिन्स अल-वलीद हे सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील आहेत, जरी ते सध्याच्या राजाचे थेट वारस नाहीत. कारण जिवंत असूनही नसल्यासारखेच आहेत.  रियाधमधील किंग अब्दुलअजीज मेडिकल सिटीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  मागील वर्षांपासून कृत्रीम मशीनवर ते आयुष्य जगत आहेत.  रोया न्यूजच्या वृत्तानुसार, प्रिन्स अल-वलीद गेल्या 20 वर्षांपासून व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांना फीडिंग ट्यूबद्वारे अन्न दिले जाते. वृत्तानुसार, “राजकुमार लाईफ सपोर्ट सिस्टमवर आहेत. मेकॅनिकल व्हेंटिलेशन आणि फीडिंग ट्यूबवर ते जिवंत आहेत. 

डॉक्टरांनी अनेक वेळा लाईफ सपोर्ट काढून टाकण्याचा सल्ला दिला. परंतु प्रिन्स अल-वलीद यांचे वडील प्रिन्स खालेद बिन तलाल यांनी याला नाकार दिला. जर अल्लाहला त्याला अपघातात मरायचे असेल तर तो कबरीत असता.” प्रिन्स अल-वलीद अजूनही वैद्यकीय उपकरणांच्या मदतीने जीवंत आहे. त्यांचे कुटुंब अजूनही ते पूर्णपणे बरे होतील या प्रतिक्षेत आहेत.
सध्या मात्र, सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत  प्रिन्स अल-वलीद पूर्णपणे बरे झाले असून लोकांशी संवाद साधत असल्याचे दिसत आहे. मात्र,  प्रिन्स अल-वलीद यांचे वडील प्रिन्स खालिद बिन तलाल यांनी हे वृत्त फेटाळले आहे. त्यांच्या प्रकृतीत आहे तशीच असून व्हायरल व्हिडिओत काही तथ्य नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.  2019 मध्ये असे  वृत्त आले होते. 

SOURCE : ZEE NEWS