Home LATEST NEWS ताजी बातमी 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतमोजणीला सुरूवात, कोणाची आघाडी?

12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतमोजणीला सुरूवात, कोणाची आघाडी?

23
0

Source :- BBC INDIA NEWS

मतदारांचे प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

27 मिनिटांपूर्वी

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

12 जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी (7 फेब्रुवारी) मतदान झालं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे.

निवडणुकीसाठी 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणुकीआधीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधे महायुतीच्या 25 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

मतदान

फोटो स्रोत, Getty Images

कोणत्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या?

राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली. त्यात खालील जिल्हा परिषदांचा समावेश आहे :

1) रायगड

2) रत्नागिरी

3) सिंधुदुर्ग

4) पुणे

5) सातारा

6) सांगली

7) कोल्हापूर

8) सोलापूर

9) छत्रपती संभाजीनगर

10) धाराशीव

11) लातूर

12) परभणी

या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशी दोन मतं द्यावी लागली होती.

पंचायत समिती निवडणूक

जिल्हा परिषदांसोबतच 125 पंचायत समित्यांसाठी 1462 सदस्यांची निवडणूक झाली. त्यातील 431 जागा महिलांसाठी, 166 जागा अनुसुचित जातींसाठी आणि 38 जागा अनुसुचित जमातींसाठी राखीव होत्या. मागास प्रवर्गासाठी 342 जागा राखीव होत्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC