Home world news marathi 11 वर्षाच्या विद्यार्थिनीला शिक्षकाने दिलं लव्ह लेटर, आईने उघडून पाहिलं तर पायाखालची...

11 वर्षाच्या विद्यार्थिनीला शिक्षकाने दिलं लव्ह लेटर, आईने उघडून पाहिलं तर पायाखालची जमीनच सरकली!

5
0

Source :- ZEE NEWS

love letter to 11-year-old student: सध्याच्या जमान्यात मुलींची काळजी घेणं हे पालकांसाठी आव्हान बनलंय. दिवसभरात कोणाची कशी वाईट नजर पडेल, कुठे लेकीला असुरक्षित वाटेल याची पालकांना सतत काळजी वाटते. असाच एक प्रकार समोर आलाय.  ज्यात अवघ्या 11 वर्षाच्या मुलीला लव्ह लेटर मिळालय. धक्कादायक म्हणजे हे लव्ह लेटर शाळेतल्या विद्यार्थ्याने दिलं नाहीय तर शिक्षकानेच दिलंय. काय आहे हा नक्की प्रकार? कुठे घडला? आणि कशी समोर आलीय ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ब्रॅडेंटन शहरात एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलीय. ज्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलंय. येथील बीडी गुलेट एलिमेंट्री स्कूलमध्ये पाचवीला शिकवणाऱ्या शिक्षक जारेट विलियम्सने आपल्या 11 वर्षाच्या विद्यार्थिनीच्या हातात लव्ह लेटर दिलं. मुलीच्या आईने 2 पानांचं लव्ह लेटर वाचलं आणि तिला धक्काच बसला. काय लहिलं होतं पत्रात? जाणून घेऊया. 

‘तुला माहिती आहे मी तुझ्यावर खरोखर प्रेम करतो… आणि काहीही झाले तरी ते कधीही बदलणार नाही.’असं शिक्षकाने पत्रात लिहीलंय.  यावर्षी आपल्यात निर्माण झालेली जवळीक मला आवडल्याचेही त्याने आपल्या पत्रात म्हटलंय. 

आईने शाळेच्या बोर्ड मीटिंगमध्ये सांगितली कहाणी 

29 एप्रिल 2025 रोजी झालेल्या शाळेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत, मुलीच्या आईने अश्रू ढाळत घडलेला प्रसंग सांगितला. ‘त्या शिक्षकाने माझ्या मुलीची निरागसता हिरावून घेतलीय. भीतीमुळे ती आता रात्री झोपू शकत नाही, ती मध्यरात्री रडत उठते.’, हे सांगताना आईला अश्रू अनावर झाले. 

शिक्षकाविरुद्ध काय कारवाई?

पत्र मिळाल्यानंतर 9 मार्च 2025 रोजी शाळा प्रशासनाने विल्यम्सला मुलांपासून दूर ठेवले. आणि त्यांच्याशी कोणताही संपर्क नसलेले काम सोपवले. यानंतर 23 एप्रिल रोजी विल्यम्सने स्वतः राजीनामा दिला. यासंदर्भात शाळेने एक निवेदन जारी करत म्हटले, ‘आम्ही मुलांच्या सुरक्षिततेला अत्यंत महत्त्वाचे मानतो आणि हे प्रकरण खूप गांभीर्याने घेतले गेले असून तपास पूर्ण होईपर्यंत खबरदारी घेतली जाईल.’

सोशल मीडियावरही लोक संतापले

हे प्रकरण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर व्हायरल होताच लोक संतापलेयत. एका यूजरने लिहिलंय, ‘फ्लोरिडा शाळांमध्ये मुले आता सुरक्षित नाहीत का?’ दुसऱ्याने लिहिले, ‘या व्यक्तीने आता मुलांपासून दूर राहावे हेच योग्य असेल.’

SOURCE : ZEE NEWS