Source :- ZEE NEWS
Myanmar Earthquake Satellite Images : शुक्रवारी 28 मार्च 2025 रोजी म्यानमार, बँकॉकमध्ये प्रचंड तीव्रतेचे भूकंप आले आणि एका क्षणात इथं सारंकाही उध्वस्त झालं. म्यानमारमध्ये आलेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपामुळे हाहाकार उडाला. म्यानमारमध्ये नेमकं काय झालं याचा अंदाज हा तिथून समोर आलेल्या फोटोंमधून दिसून आलं आहे. स्वत: भारताची स्पेस एजेंसी इस्रो म्यानमारच्या भूकंपाचे फोटो शेअर केले आहेत. या भूकंपानंतर तिथे किती नुकसान झालं आणि नेमकं आता तिथली परिस्थिती कशी आहे याविषयी माहिती दिली आहे.
इस्रो म्हणजेच भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने 28 मार्च रोजी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपामुळे जे काही चित्र तयार झालं. इस्रोच्या ‘कार्टोसॅट-३’ या उपग्रहानं भूकंपामुळे झालेल्या नुकसानाचे फोटो काढले आहेत. हे इस्रोनं शेअर केले आहेत. भूकंपानंतर 29 मार्च रोजी म्यानमारच्या मंडाले आणि सागाईंग शहरांवर ‘कार्टोसॅट-3’ ने घेतलेले फोटो असल्याचे इस्रोनं म्हटले आहे. म्यानमारमध्ये आलेल्या या भूकंपाचे झटके हे त्याच्या असलेल्या थायलॅन्ड आणि भारताला देखील जाणवले. या भूकंपामुळे खूप मोठं नुकसान झालं. महत्त्वाचं म्हणजे म्यानमारचं दुसरं मोठं शहर मांडलेमध्ये आलेल्या भूकंपानं सगळ्यांना हादरवून सोडलं. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 1700 पेक्षा जास्त लोकांचं निधन झालं आहे.
अंतराळ संस्थेच्या पृथ्वी इमेजिंग सॅटेलाइट कार्टोसॅट-3 ने पृथ्वीपासून 500 किलोमीटर उंचीवरून प्रतिमा टिपल्या. हे 50 सेंटीमीटर पेक्षा कमी रिझोल्यूशनवर फोटो काढण्यास मदत करू शकते. या फोटोंमध्ये भूकंपाचे भयानक दृश्य पाहता येणार आहे. भूकंपानंतर ISRO च्या कार्टोसॅट-3 च्या मदतीनं मिळालेले हे सॅटेलाइट फोटो पाहता त्यात हे स्पष्ट दिसून येत आहे की त्या भूकंपानं किती नुकसान झालं आहे. इस्रोनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये दिसून येत आहे की कशा प्रकारे इरावदी नदीवर असलेला एक मोठा पूल हा कोसळला आहे. मांडले यूनिव्हर्सिटीत किती नुकसान झालं ते देखील त्यात दाखवलं आहे.
भूकंपामुळे अनेक म्यानमारच्या अनेक भागांमध्ये खूप नुकसान झालं. अनेक लोक हे जखमी झाले आहेत, तर अनेकांनी त्यांचा जीव गमावला आहे. रस्ते आणि इमारती आणि ऐतिहासिक इमारतीसारख्या वास्तूंचं मोठं नुकसान झालं आहे. इरावती नदीच्या जवळपासच्या परिसरात भेगा, जमीन फुटणे आणि इतर तत्सम घटना देखील दिसून आल्या.
हेही वाचा : इन्फ्लुएन्सर ते अभिनेत्री… 5 कोटींचं घर घेत बिहारची तरुणी झाली मुंबईकर
मांडले आणि पासच्या सागिंग क्षेत्रात खूप नुकसान झाल्याची बातमी आली. 29 मार्चला घेण्यात आलेले फोटोंमध्ये मांडलेच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. यामध्ये पूर्णपणे किंवा अंशतः कोसळलेल्या महत्त्वाच्या स्थळांचा समावेश आहे. महामुनी पॅगोडा आणि ऐतिहासिक अवा ब्रिज यांसारखी अनेक प्रमुख स्थळेही कोसळली. याशिवाय थायलंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे तेथेही आपत्कालीन मदत सुरू करावी लागली.
SOURCE : ZEE NEWS