Home world news marathi ‘माझ्या हॉटेलमधील बेडच्या आत तरुण होता, त्याने…,’ सोलो ट्रिपवर गेलेल्या तरुणीला धक्कादायक...

‘माझ्या हॉटेलमधील बेडच्या आत तरुण होता, त्याने…,’ सोलो ट्रिपवर गेलेल्या तरुणीला धक्कादायक अनुभव, शेअर केला VIDEO

2
0

Source :- ZEE NEWS

सध्याच्या जमान्यात अनेक तरुणी सोलो म्हणजेच एकटेपणाने प्रवास करत नव्या जागा, गोष्टींचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे त्यांना स्वातंत्र्याचा अनुभव घेण्याची संधी मिळते. पण जेव्हा तरुणी किंवा महिला एकट्याने प्रवास करतात तेव्हा त्यांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पुरुषांच्या तुलनेत जास्त काळजी घ्यावी लागते. एकट्या तरुणींना घेरुन चोरी, छेडछाड असे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे ही चिंता असणं साहजिक असल्याचं लक्षात येतं. 

थायलंडमधील सोलो ट्रॅव्हलर असणाऱ्या नतालिसी ताक्सिसीला जपानमध्ये एका भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला. तिला तिच्या हॉटेलच्या बेडखाली एक पुरूष लपलेला आढळला. यानंतर तिचा हा सुखाचा प्रवास अचानक दु:खात रुपांतरित झाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ताक्सिसीने सांगितलं की, तिने जपानसाठी सोलो ट्रिप बुक केली होती. तिला हा देश महिलांसाठी सुरक्षित आहे अस वाटलं होतं. दरम्यान दिवसभर फिरल्यानंतर ती तिच्या हॉटेलच्या खोलीत परतली, जिथे प्रवेशासाठी एक की कार्ड सिस्टम होती.

ती बेडवर झोपली असता तिला खालून काहीतरी वेगळाच वास येत असल्याचं लक्षात आलं. उत्सुक आणि अस्वस्थ झाल्याने तिन बेडखाली पाहिलं असता पायाखालची जमीनच सरकली. “दोन डोळे माझ्याकडे पाहत असल्याचे दिसलं,” अशी धक्कादायक आपबीती तिने सांगितली. 

यानंतर तो माणूस खोलीतून पळून गेला. धक्का बसलेल्या आणि घाबरलेल्या तक्सीसीने ताबडतोब हॉटेल कर्मचाऱ्यांना माहिती दिली, ज्यांनी नंतर पोलिसांना फोन केला. हॉटेलमधील एकही सीसीटीव्ही कॅमेरा सुरु नव्हता हेदेखली तिने अधोरेखित केलं आहे. 

नंतर अधिकाऱ्यांना खोलीत एक पॉवर बँक आणि एक यूएसबी केबल सापडली. या धक्कादायक अनुभवानंतर तिने भरपाईची विनंती केल्यानंतरही, हॉटेलने तिला पूर्ण पैसे परत करण्यास नकार दिला. त्याच रात्री ती दुसऱ्या हॉटेलमध्ये गेली, पण दुसऱ्या दिवशीही तिला तिच्या पोलिस रिपोर्टची प्रत ईमेलद्वारे मिळाली नव्हती.

इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना, ताक्सिसीने लिहिलं आहे की , “मला जपानमधील एका हॉटेलच्या खोलीत माझ्या बेडखाली एक माणूस सापडला. ही मी एकटीने करत असलेली सुरक्षित सहल असायला हवी होती. जे घडले त्यामुळे सर्व काही बदलले”. मी एपीए हॉटेलसाठी 510 डॉलर्स खर्च केले अशी माहितीही तिने दिली आहे. 

व्हिडिओला जवळजवळ दोन दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्स व्यक्त होत आहेत. “प्रत्येक बुकिंग प्लॅटफॉर्मवर या हॉटेलवर बंदी घालण्यात आली आहे,” असं एका युजरने लिहिलं आहे.  “तुमच्यासोबत असे घडले हे त्यासाठी माफ करा. पण आपा हॉटेल हे एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांसाठीचे हॉटेल नाही. चांगली जागा बुक करण्याचा प्रयत्न करा,” असं दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे.

SOURCE : ZEE NEWS