Home LATEST NEWS ताजी बातमी महाराष्ट्राच्या नायिका: सावित्रीबाई फुलेंच्या सहकारी फातिमा शेख कोण होत्या?

महाराष्ट्राच्या नायिका: सावित्रीबाई फुलेंच्या सहकारी फातिमा शेख कोण होत्या?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

फातिमा शेख

(महाराष्ट्र स्थापना दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान असलेल्या महिलांच्या कार्याचा परिचय करुन देत आहोत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी फातिमा यांची ओळख या लेखातून आपण करुन घेऊ. )

महाराष्ट्राला एक मोठी वैचारिक परंपरा लाभली आहे. राज्याच्या उभारणीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची ओळख करुन घेणे हे त्यामुळेच अगत्याचे ठरते.

महाराष्ट्राच्या इतिहासात महिलांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा, विज्ञान अशा विविध क्षेत्रात अतुलनीय योगदान आहे.

आपण ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी जाणतोच. ज्योतिबांनी वंचितांपर्यंत शिक्षण पोहचवण्याचं काम केलं. ते सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते.

सावित्रीबाई देशातल्या पहिल्या महिला शिक्षक. त्यांना आपण क्रांतिज्योती म्हणतो.

सावित्रीबाई म्हणत असतील की, माझ्या अनुपस्थितीत माझी सहकारी शाळेचं सगळं काम नीटपणे सांभाळेल, काहीही तोशीस पडू देणार नाही, तर ती स्त्रीही कमी नसणार. सावित्रीबाईंच्या अनुपस्थितीत त्यांनी सुरू केलेल्या शाळेची धुरा समर्थपणे वाहणारी स्त्री म्हणजे फातिमा शेख.

या दुर्मिळ छायाचित्रात उजवीकडे सावित्रीबाई, तर डावीकडे त्यांच्या सहकारी शिक्षिका फातिमा शेख

फोटो स्रोत, GOVERNMENT OF MAHARASHTRA

त्या उस्मान शेख यांची बहीण होत्या असंही म्हटलं जातं. एका कथेनुसार जेव्हा महात्मा फुलेंनी मुलींसाठी शाळा सुरू केली तेव्हा त्यांचा वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं. त्यावेळेस उस्मान शेख यांनी त्यांना आपल्याकडे जागा दिली. पण उस्मान शेख यांच्याविषयीही फारशी माहिती मिळत नाही.

फातिमा शेख यांच्याविषयी एक धागा सापडतो ‘सावित्रीबाई फुले समग्र वांङ्मय’ या पुस्तकात. त्या पुस्तकात एक फोटो आहे, ज्यात सावित्रीबाईंच्या शेजारी आणखी एक महिला बसली आहे. ही महिला दुसरी-तिसरी कोणी नसून फातिमा शेख आहेत.

फातिमा शेख यांचा ऐतिहासिक फोटो

‘सावित्रीबाई फुले समग्र वांङ्मय’ या पुस्तकाचे संपादक डॉक्टर म. गो. माळी यांनी आपल्या प्रस्तावनेत महत्त्वाची माहिती दिली आहे.

फातिमा शेख आणि सावित्रीबाई

फोटो स्रोत, Maharashtra Government

सावित्रीबाईंचा फोटो कित्येक वर्षांपूर्वी पुण्याहून प्रकाशित होणाऱ्या ‘मजूर’ या मासिकात छापला होता. हे मासिक 1924-30 या काळात प्रकाशित होत होतं. याचे संपादक रा. ना. लाड होते.

तर माळींना हा फोटो द. स. झोडगे यांच्याकडून मिळाला. झोडगे स्वतः काही काळ ‘मजूर’ मासिकाचे संपादक होते.

ग्राफिक्स

लोखंडे नावाचे एक ख्रिस्ती मिशनरी होते. त्यांनी काढलेल्या पुस्तकातही सावित्रीबाईंचा एक फोटो प्रसिद्ध झाला आहे. ‘मजूर’ मासिकात प्रसिद्ध झालेला फोटो तसंच या पुस्तकातला फोटो दोन्ही सारखेच आहेत.

या फोटोत सावित्रीबाईंच्या दोन विद्यार्थीनी खाली बसल्या आहेत आणि स्वतः सावित्रीबाई आणि फातिमा शेख या फोटोत दिसतात. या ग्रुप फोटोवरून सावित्रीबाईंचा तो फोटो तयार केला गेला जो आज आपण सर्वत्र पाहातो.

हा फोटो नसता तर कदाचित आपल्याला फातिमा शेख यांच्याविषयी काहीच माहिती मिळाली नसती. इतकंच काय, आपल्याला सावित्रीबाई कशा दिसतात हेही कळालं नसतं. याच फोटोने फातिमा शेख यांना सावित्रीबाईंसारखंच इतिहासातलं महत्त्वाचं नाव बनवलं आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

दलित, वंचित आणि स्त्रियांना शिक्षण दिलं म्हणून फुले दांपत्याला अनेक त्रास सहन करावे लागले हे आपण जाणतोच. सावित्रीबाईंना तर अपमान, शिव्या, अंगावर शेण फेकणे अशा अनेक यातना सहन कराव्या लागल्या. जर सावित्रीबाईंच्या अंगावर दगड, चिखल, शेण फेकलं गेलं असेल तर दाट शक्यता आहे की सावित्रीबाईंसोबत सहशिक्षिका म्हणून काम करताना फातिमा शेख यांनाही अशाच त्रासाला तोंड द्यावं लागलं असेल.

फातिमा यांचं वय साधारण सावित्रीबाईंइतकंच होतं, त्यामुळे त्यांचा जन्म साधारण 180-190 वर्षांपूर्वी झालेला असू शकतो. त्यांनी प्रामुख्याने पुण्यात काम केलं.

सावित्रीबाईंचं पत्र

सावित्रीबाईंनी ज्योतिबांना लिहिलेल्या एका पत्रात फातिमा शेख यांचा उल्लेख सापडतो. सावित्रीबाईंची तब्येत खराब असताना त्यांनी 10 ऑक्टोबर 1856 साली ज्योतिबांना एक पत्र लिहिलं होतं. तोवर वंचितांसाठी, महिलांसाठी पुण्यात अनेक शाळा या दांपत्यांने उभ्या केल्या होत्या.

त्यांची चिंता ज्योतिबांना असणं साहजिकच होतं. त्यांना आश्वस्त करण्यासाठी त्या लिहितात, “माझी काळजी करू नका, तब्येत ठीक होताच मी पुण्यात परत येईन. फातिमाला सध्या त्रास होत असेल पण ती कुरकुर करणार नाही.”

फातिमाला कसला त्रास, तर सावित्रीबाईंच्या अनुपस्थिती शाळेची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती.

ग्राफिक्स

फोटो स्रोत, BBC/Gopal Shoonya

फातिमा कोणी साधीसुधी महिला नव्हती. फातिमा सावित्रीबाईंची मैत्रीण आणि सहकारी होत्या. त्यांना स्वतःचं अस्तित्व होतं आणि सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून त्या वंचिताच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढल्या.

फातिमा शेख यांच्याबाबत जानेवारी महिन्यात सोशल मीडियात वाद निर्माण झाला होता. फातिमा शेख या खरंच क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या सहकारी होत्या का, यावर देखील शंका उपस्थित करण्यात आली होती. बीबीसीने मराठीने यावर ऐतिहासिक पुरावे काय सांगतात, अशी बातमी प्रसिद्ध केली होती. ती तुम्ही या ठिकाणी वाचू शकता.

फातिमा शेख यांच्यापासून प्रेरणा घेत अल्पसंख्यांक समुदायातील अनेक महिला शिक्षण घेत आहेत. तसेच शिक्षण प्रसार आणि प्रचाराच्या कार्यात फातिमा शेख यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांनी आपल्या संस्थांना देखील फातिमा यांचे नाव दिले आहे. त्यामुळे फातिमा यांचे महत्त्व केवळ ऐतिहासिकच नसून प्रासंगिकही असल्याची जाणीव होते.

(हा लेख पहिल्यांदा बीबीसीवर सावित्रीच्या सोबतिणी या लेखमालेत प्रसिद्ध करण्यात आला होता.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC