Source :- ZEE NEWS
Gold Discovery: भारता शत्रू देश अचानक श्रीमंत झाला आहे. या देशात इतकी मोठी सोन्याची खाण सापडली आहे की एकाचवेळी 10,00,00 KG सोनं काढण्यात आले. या खाणीत उत्खनन सुरुच असून अजूनही सोन्याचे साठे निघत आहेत. सोन्याच्या खाणीच्या ऐतिहासिक शोधामुळे हा देश आता थेट दुबईला टक्कर देणार आहे.
भारता शेजारी आणि कट्टर शत्रू असलेल्या चीनमध्ये सोन्याची मोठी खाण सापडली आहे. बीजिंगमध्ये सापडलेल्या या सोन्याच्या खाणीमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला भरारी येणार आहे. येथे 10,00,00 किलो सोने असू शकते असा असा दावा केला जात आहे. संशोधकांच्या मते, जरी चीनला औद्योगिक क्षेत्रात महासत्तेचा दर्जा असला तरी, इतक्या मोठ्या सोन्याच्या साठ्याचा शोध लागल्याने चीनची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
सोन्याचा हा साठा हुनान प्रांतातील पिंगजियांग काउंटीमधील वांगू गोल्ड फील्डमध्ये जमिनीखाली खोलवर सापडला आहे. जमिनीखाली सुमारे 3,000 मीटर खोलीवर हा साठा आहे. या नव्याने सापडलेल्या खाणीत सुमारे 1000 टन सोने असल्याचा अंदाज आहे. म्हणजे दहा लाख टन सोने आहे. हा जगातील सर्वात मोठा ज्ञात सोन्याचा साठा असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे.
इतिहासात सापडलेल्या सर्व सोन्याने बास्केटबॉल कोर्ट भरणेही कठीण आहे, त्यामुळे या नवीन शोधामुळे इतिहासात सापडलेल्या सर्व सोन्यात 0.5 टक्के पेक्षा जास्त भर पडू शकते. व्यावसायिकांना खाणीत 40 हून अधिक सोन्याच्या व्हेन आढळल्या आहेत. यापैकी काहींमध्ये प्रति टन 138 ग्रॅम सोने होते. हे जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. जगभरातील इतर अनेक खाणी प्रति टन 2 ते 8 ग्रॅम इकरे सोनं सापडते.
SOURCE : ZEE NEWS