Home world news marathi भारताचा ‘सिक्रेट प्लान’ जगासमोर आणणारा हा माणूस आहे तरी कोण? म्हणे पाकिस्तानभोवतीचा...

भारताचा ‘सिक्रेट प्लान’ जगासमोर आणणारा हा माणूस आहे तरी कोण? म्हणे पाकिस्तानभोवतीचा गळफास आवळला जाणार…

3
0

Source :- ZEE NEWS

Operation Sindoor  : पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या जखमा लक्षात ठेवत भारत सरकारनं हा त्याची व्याजासह परतफेड केली असं म्हणणं गैर ठरणार नाही. 6-7 मे रोजी मध्यरात्री पाकिस्तान गाढ झोपेत असतानाच भारतीय सैन्य आणि वायुदलानं अवघ्या 23 ते 25 मिनिटांमध्ये शत्रू राष्ट्रातील 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले आणि दहशतवादाचा कणा मोडण्यासाठी मोठा आघात केला. 

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहर याच्या कुटुंबातील 14 जणांचा या स्ट्राईकमध्ये मृत्यू ओढावला आणि त्यानंही तिथं थयथयाट केला. भारताच्या हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानमध्ये सत्ताधाऱ्यांनी  सैन्याला भारतावर कारवाई करण्याची खुली मुभा दिली मात्र त्यांच्या कैक कारवाया सीमाभागातच भारतीय सैन्यानं हाणून पाडत ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor ) च्या प्रत्युत्तरात कारवाई केल्यास हा निर्णय पाकिस्तानला महागात पडेल असंच भारताकडून ठणकावून सांगण्यात आलं. भारताची एकंदर युद्धनिती काय आहे, यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती याच सर्व घडामोडींदरम्यान एका महत्त्वाच्या व्यक्तीनं जगासमोर आणली. 

भारतीय लष्कराच्या या रणनितीला उघड करणारी ही व्यक्ती म्हणजे अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह. भारतानं ही एका गळफासाच्या दोराचीच रणनिती इथं अवलंबली आहे असं म्हणअत त्यांनी भारताडकून पाकिस्तानला एका झटक्यात धडा शिकवण्याऐवजी या देशाच्या गळ्यात जणू एक दोर टाकण्यात आला आहे आणि आता हळुहळू हा दोर आवळला जाणार आहे असंच सालेह यांनी स्पष्ट केलं. 

दोर आवळण्यास सुरुवात… 

एक्स या सोशल मीडिया माध्यमातून सालेह यांनी पोस्ट करत म्हटलं, ‘पाकिस्तानविरोधात भारतानं केलेली कारवाई धाडसी, अभूतपूर्व आणि दिलेल्या वचनानुसारच होती. त्यांनी (भारतानं) पाकिस्तानच्या गळ्यात जणू फाशीचाच दोर टाकला आहे. या दोराला 9 गाठी आहेत ज्या एकामागून एक मारण्यात येतील. सध्या ऑपरेशन सिंदूर करत भारतानं ही पहिली गाठ आवळली आहे.’

पाकिस्तानकडून भारताच्या या हल्ल्याचा निषेध करत तो भ्याड हल्ला म्हटला जात आहे याचच आपल्याचा आश्चर्य वाटतंय असं म्हणत उलटपक्षी पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांवर आत्मघातकी बॉम्बस्फोटांवर त्यांनी प्रकाश टाकत पाकच्या विद्रोही वृत्तीचा निषेध केला आणि भारताच्या या कारवाईचं त्यांनी कौतुकच केलं. 

कोण आहेत भारताचं समर्थन करणारे अमरुल्लाह सालेह? 

अमरुल्लाह सालेह अफगाणिस्तानातील मूळचे ताजिक नेते आहेत. अशरफ गनई यांच्या कार्यकाळात ते अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतीपदी होते. तालिबान आणि पाकिस्तानचे कट्टर विरोधी अशीसुद्धा त्यांची ओळख आहे. तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच सालेह यांनी हा देश सोडून ताजिकिस्तानमध्ये आश्रय घेतला, जिथं त्यांच्या मूळ वंशाचा समुदाय आहे. अफगाणिस्तानातील सर्व वाईट परिस्थितीसाठी ते कायमच पाकिस्तानचा दोष देतना दिसले आणि यावेळीसुद्धा त्यांनी अतिशय ठामपणे पाकिस्तानविरोधी भूमिका मांडली. 

SOURCE : ZEE NEWS