Source :- ZEE NEWS
George V Nereaparambil Flats In World Tallest Building Burj Khalifa : बुर्ज खलिफा… जगातील लाखो लोकांचे ड्रिम डेस्टीनेश… जगातील सगळ्यात उंच इमारत. खलिफा माहित नाही असं क्वचितच कुणी तरी सापडेल. जगभरातील पर्यटक खास बुर्ज खलिफा पाहण्यासाठी दुबईत येतात. जगातील सर्वात महागडी इमारत अशी देखील बुर्ज खलिफाची ओळख आहे. बुर्ज खलिफामध्ये अपार्टमेंट किंवा फ्लॅट खरेदी करायचा असेल कोट्यावधी रुपये मोजावे लागतात. मात्र, भारतातील एका बिझनेस मॅनचे बुर्ज खलिफा इमारतीत तब्बल 22 फ्लॅट आहेत. हा बिझनेस मॅन किंग ऑफ बुर्ज खलिफा म्हणूनही ओळखला जातो. जाणून घेऊया हा बिझनेस मॅन कोण आहे.
163 मजल्यांची बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. बुर्ज खलिफाची उंची एवढी आहे की तुम्ही ती नव्वद किलोमीटर अंतरावरूनही ही इमारत दिसते. बुर्ज खलिफा इमारतीत 900 अपार्टमेंट आणि 304 हॉटेल्स आहे. बुर्ज खलिफाच्या 76 व्या मजल्यावर असलेला स्विमिंग पूल जगातील सर्वात उंच स्विमिंग पूलपैकी एक आहे. बुर्ज खलिफामध्ये 58 लिफ्ट आणि 2957 पार्किंग स्पेस आहे.
बुर्ज खलिफामधील 900 अपार्टमेंटपैकी 150 अपार्टमेंटचे मालक भारतीय आहेत. यापैकी 22 अपार्टमेंटचा मालक एकच व्यक्ती आहे. 22 अपार्टमेंटचा मालक असलेल्या या भारतीय उद्योगपतीचे नाव आहे जॉर्ज व्ही. नेरेम्पराम्बिल. 22 फ्लॅट्सच्या मालकीमुळे जॉर्ज हे बुर्ज खलीफामधील सर्वात मोठे खाजगी मालमत्ता मालक आहेत.
केरळमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या जॉर्जने वयाच्या 11 व्या वर्षीपासून वडिलांना कामात मदत करण्यास सुरुवात केली. यानंतर ते कामाच्या शोधात ते दुबईला पोहचले. सुरुवातील मेकॅनिक म्हणून काम केले. यानंतर त्यांनी एयर कंडीशनिंग व्यवसाय सुरु केला. त्यांनी स्वतःची एक छोटी कंपनी सुरू केली. आज ही कंपनी GEO ग्रुप ऑफ कंपनीज म्हणून ओळखली जाते. जॉर्ज हे दुबईचे एक प्रसिद्ध बिझनेस टायकून बनले आहेत. 2010 मध्ये बुर्ज खलीफामध्ये पहिला एक फ्लॅट भाड्याने घेतला. यानंतर त्यांनी एक एक करत तब्बल 22 फ्लॅट खरेदी केले. या फ्लॅटच्या भिंतींना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. जॉर्ज यांची नेटवर्थ 4800 कोटी रूपयांहून अधिक असल्याचे समजेत.
SOURCE : ZEE NEWS