Source :- ZEE NEWS
India Pakistan War: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमक भूमिकेने पाकच्याही लष्कराच्या हालचाली सुरू झालेत. पाकच्या नेत्यांना तर युद्धाची खुमखुमी आलीय. मात्र 1971 च्या युद्धात भारताने पाकला चारीमुंड्या चीत केलं होतं. आणि याचा आरसाच बलुचिस्तानच्या माजी मुख्यमंत्र्याने पाकला दाखवलाय.
युद्धाची खुमखुमी असलेला पाकिस्तान लष्करी सामर्थ्यामध्ये भारताच्या जवळपासही नाही हे संपूर्ण जगाला माहिताय. आतापर्यंत अनेकदा भारताने पाकड्यांना धूळ चारलीय हा इतिहास आहे.. एवढं सगळं असतानाही पाकिस्तानी मंत्री, अनेक नेते हे युद्धाच्या वल्गणा करताना दिसताहेत. मात्र 1971 वस्त्रहरण पाकिस्तान विसरलेला दिसतोय.. भारताला धमक्या देणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांनी 1971 मध्ये पाकिस्तानच्या कशा चिंध्या झाल्या होत्या याचा इतिसाह वाचावा.. असं म्हणत बलुच नेते आणि बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री सरदार अख्तर मेंगल यांनी पाक लष्कर प्रमुख आसिफ मुनिर यांनी झापलंय.
या 1971 च्या युद्धात 90 हजार पाकिस्तानी सैन्याने जीव वाचवण्यासाठी भारतासमोर शरणागती पत्करल्याचं सांगित मेंगल यांनी पाकिस्तानला आरसा दाखवलाय.. तर या युद्धबंदींना निशस्त्र करून भारताना रस्ता बनवण्याच्या कामाला लावल्याचा इतिहास आहे.
बलुस्तानमधील जनता आणि नेते यांना पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरोधा प्रचंड संताप आहेत. पाकिस्तान बलुस्तानवर अन्याय करतंय अशी भावना बलुचिस्तानमध्ये आहे. त्यातूनच अख्तर मेंगल यांनी पाकवर हा निशाणा साधलाय.आता तर बलुच नेत्यांनी पाकविरोधात उघड उघड भूमिका घ्यायला सुरूवात केलीय.
आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानात रोजच्या जेवणाची भ्रांत निर्माण झालीय.. महागाई, बेरोजगारी, गृहयुद्ध यामुळे पाकिस्तान संकटात आहे. मात्र पाकची युद्धाची खुमखुमी काही कमी होत नाहीय. मात्र अख्तर मेंगल यांनी पाकला 1971 च्या युद्धात झालेल्या वस्त्रहरणाची आठवण करून दिलीय. हा इतिहासपाहूनतरी पाकिस्तान शहाणं होतं का हे पाहावं लागणार आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बैठकीत दाखवून दिली जागा
5 मे 2025 रोजी पार पडलेल्या या बैठकीसंदर्भातील कोणतंही अधिकृत विधान UN च्या वतीनं जारी करण्यात आलेलं नाही. मात्र संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना काही महत्त्वाचे मुद्दे जाहीर केले. भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावावर तोडगा काढत या परिस्थितीवर चर्चात्मक मार्गानं कोणती वाट काढता येईल आणि माहितीच्या देवाणघेवाणीनं कशा प्रकारे ही चर्चा अधिक सक्षम करता येईल यावर भर देण्यात आल्याचं ते म्हणाले. तर, ग्रीसच्या राजदूतांनी या बैठकीतून सकारात्मक परिणाम दिसून आल्याची माहिती दिली. आम्हाला हा तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती रशियाच्या राजदूतांनी दिली. सुरक्षा परिषदेच्या बैठकीपूर्वी भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सह्यद अकबरुद्दीन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना या बैठकीतून किंवा चर्चेतून कोणताही तोडगा निघेल अशी आशा वाटत नसल्याचं वक्तव्य केलं होतं. तर, या बैठकीनंतर ते म्हणाले, ‘यापूर्वीप्रमाणेच आजही पाकिस्तानची अरेरावी इथं अपयशी ठरली. याआधी अपेक्षित असल्याप्रमाणेच परिषदेकडून कोणतीही समाधानकारक प्रतिक्रिया देण्यात आली नाही. भारतीय कूटनितीनं सुरक्षा परिषदेच्या हस्तक्षेपाची मागणी करणाऱ्या पाकिस्तानच्या सर्वच प्रयत्नांना हाणून पाडलं’. बंद खोलीत झालेल्या या पैठकीपूर्वीच संयुक्त राष्ट्र संघटनेते महासचिव एंटोनियो गुटरेस यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या या तणावाला आतापर्यंतच्या गंभीर स्तराचा तणाव म्हणून संबोधत चिंता व्यक्त केली आणि या हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली. नागरिकांना निशाण्यावर घेणं स्वीकारार्ह नसल्याचं त्यांनी परखड स्वरांत म्हटलं.
SOURCE : ZEE NEWS