Source :- ZEE NEWS
Pakistan Lockdown Emergency : काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भयान शांतता पसरली आहे. भारताकडून पाकिस्तानवर संभाव लष्करी कारवाईची भीती असल्याने पाकिस्तानने सुरक्षेच्या दृष्टीने पीओके प्रशासनाने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान चौधरी अन्वर-उल-हक यांनी गुरुवारी विधानसभेत निवेदन देताना असे संकेत दिले की, जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर या प्रदेशात आणीबाणी जाहीर करण्यात येऊ शकते. या विधानानंतर संपूर्ण परिसरात अस्वस्थता आणि सतर्कता वाढली पाहिला मिळत आहे.
पाकिस्तानमध्ये पीओके सरकारने नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील भागात पर्यटकांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. नीलम व्हॅली आणि लीपा व्हॅली सारख्या भागात कडक देखरेख वाढवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी मार्बल चेकपोस्टवरून अनेक पर्यटकांना परत पाठवले आहेत. तर स्थानिक रहिवाशांना नियंत्रण रेषेकडे जायला बंदी करण्यात आली आहे. तसंच, नागरिकांना सुरक्षा यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे.
गुप्तचर माहितीच्या आधारे, पीओके प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धार्मिक मदरसे 10 दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. भारत या मदरशांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे म्हणून घोषित करून कारवाई करू शकतो अशी भीतीने पाकिस्तानने निर्णय घेतला आहे. पीओकेचे कायदा मंत्री मियां अब्दुल वाहिद यांनी भारतावर तीव्र हल्ला चढवत म्हटलं की, ते एका ‘धूर्त, निर्दयी आणि कट रचणाऱ्या’ शत्रूशी सामना करत आहेत आणि कोणत्याही प्राणघातक कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.
त्याच वेळी, भारताकडून संभाव्य आक्रमण झाल्यास सामान्य जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तयारी वाढवली आहे. पीओके सरकारने अन्न, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आपत्कालीन निधीमध्ये 1 अब्ज रुपये हस्तांतरित केले आहेत. याशिवाय, हॉटेल्स, गेस्टहाऊस आणि लग्नाच्या सभागृहांच्या मालकांनी सैन्याच्या समर्थनार्थ त्यांच्या आस्थापना तात्पुरत्या स्वरूपात हस्तांतरित करण्याच आवाहन केलं आहे.
त्याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाल्याचा पाहिला मिळत आहे. मे महिन्यात कराची आणि लाहोर हवाई क्षेत्रात दररोज आठ तासांसाठी (सकाळी 8 ते दुपारी 4) उड्डाणे बंद राहणार आहे. त्याचा परिणाम गिलगिट-बाल्टिस्तानपर्यंत पोहोचला आहे, जिथून इस्लामाबादला जाणारी उड्डाणे सलग दुसऱ्या दिवशी रद्द करावी लागली. गिलगिट आणि स्कार्दूला जाणाऱ्या विमान सेवांवरही परिणाम झाला आहे. तसंच, इस्लामाबाद विमानतळावरील खराब हवामानामुळे, अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे एकतर उशिराने झाली किंवा इतर विमानतळांवर वळवण्यात आली.
SOURCE : ZEE NEWS