Home world news marathi पाकिस्तानने केली मिसाइल चाचणीची घोषणा; भारताने कडक कारवाई केल्यानंतर पाकिस्तान बिथरला

पाकिस्तानने केली मिसाइल चाचणीची घोषणा; भारताने कडक कारवाई केल्यानंतर पाकिस्तान बिथरला

6
0

Source :- ZEE NEWS

Pakistan On Pahalgam Terrorism Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या  हल्ल्यात 26  भारतीय निष्पाप हिंदू नागरिकांची हत्या करण्यात आली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून कठोर पावले उचलण्यात आली.  भारताने कडक कारवाई केल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानने  मिसाइल चाचणीची घोषणा केली आहे. 

हल्ल्यानंतर भारताने तताडीने कडक सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला. तसेच 48 तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारतातून बाहेर होण्यास सांगण्यात आले. याशिवाय, भारतातील पाकिस्तानचे उच्च आयुक्तालयही बंद करण्यात आले. भारताने कडक कारवाई केल्यानंतर पाकिस्तान बिथरला असून त्यांनी दुसऱ्याच दिवशी क्षेपणास्त्र चाचणी करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानने 24  किंवा 25 एप्रिल रोजी त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात कराची किनाऱ्याजवळ जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना जारी केली आहे. 

वृत्तसंस्था एएनआयने संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तानने 24, 25 एप्रिल रोजी कराची किनाऱ्याजवळ त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रातून चाचणी घेण्याची माहिती दिली आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे असे हे मिसाइल आहे. हे क्षेपणास्त्र चाचणी करण्याची अधिसूचना पाकिस्तानने जारी केली आहे. त्यामुळे संबंधित भारतीय संस्था या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान,  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.  बिहारमधल्या एका कार्यक्रमात मोदींनी भाषणाआधी दोन मिनिटं मौन बाळगत पहलगाम हल्ल्यातल्या मृतांना श्रध्दांजली वाहीली  आणि त्यांनंतर भाषणात पहलगाम इथला हल्ला हा केवळ पर्यटकांवरचा हल्ला नसून भारताच्या आत्म्यावर हल्ला केलाय त्यामुळे आता वेळ आली आहे. दहशतवाद्यांच्या कल्पनेपलिकडची कठोरात कठोर कारवाई होईल असा इशारा मोदींनी दिलाय इतकंच नाही तर त्यांचा उरलासुरला आधारही नष्ट करू असं मोदींनी म्हटलंय.

SOURCE : ZEE NEWS