Home world news marathi पाकिस्तानच्या मुळाशी का उठलीय बलुच आर्मी? दोघांमध्ये काय आहे नेमका वाद?

पाकिस्तानच्या मुळाशी का उठलीय बलुच आर्मी? दोघांमध्ये काय आहे नेमका वाद?

5
0

Source :- ZEE NEWS

Pakistan Vs Balochistan: ऑपरेशन सिंदुरनंतर पाकिस्तानला मोठा फटका बसलाय…त्यातच बीएलए म्हणजेच बलूच लिबरेशन आर्मीनेही पाकिस्तानला झटका दिलाय.बलुचिस्तानने पाकिस्तानी लष्काराच्या गाडीवर IED हल्ला केलाय. यात 12 पाकिस्तानी सैनिक मारले गेलेत.
ऑपरेशन सिंदूर’चे हल्ले ताजे असतानाच पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैनिकांवर दोन हल्ले केले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात 14 सैनिक ठार झाल्याची माहिती आहे. पाकिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये नेमका वाद काय आहे? जाणून घेऊया. 

बीएलएने पाकिस्तानी लष्करी ताफ्याच्या वाहनावर रिमोट-कंट्रोल आयईडी हल्ला केला. या स्फोटात स्पेशल ऑपरेशन्स कमांडर तारिक इम्रान आणि सुभेदार उमर फारूख यांच्यासह सर्व 12 सैनिकांचा मृत्यू झालाय. स्फोटात गाडीचे अगदी तुकडे तुकडे झाले. दरम्यान भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर बलुचिस्तानमध्ये आनंदाचं वातावरण बाहायला मिळालं.अगदी लोकांनी डान्स करत आपला आनंद व्यक्त केलाय. बलुचिस्तानने पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करत वेगळ्या बलूचची मागणी पुन्हा तीव्र केलीये. बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा वाद हा फार जुना आहे.हा वाद पाकिस्तानी सरकारमधील राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक मतभेदांवर आधारित आहे. गेल्या अनेक दशकांपासून बलुच नागरिक स्वतंत्र राष्ट्राची मागणी करतायेत.

काय आहे बलुच पाकिस्तान वाद?

बलुचिस्तान हा भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे (देशाच्या 44% क्षेत्रफळ), परंतु तो सर्वात कमी लोकसंख्या असलेला आणि कमी विकसित आहे. बलुच लोक एक स्वतंत्र जातीय-भाषिक समूह आहेत, ज्यांची संस्कृती आणि भाषा (बलुची) वेगळी आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, बलुचिस्तान हा स्वायत्त राहिला आहे, आणि 1947 मध्ये पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी बलुचिस्तानच्या काही भागांनी स्वातंत्र्याची मागणी केली होती. 1947 मध्ये ब्रिटिश राजवटीचा अंत झाल्यानंतर, बलुचिस्तानमधील काही नेत्यांनी स्वातंत्र्याची मागणी केली होती. तथापि, बलुचिस्तानच्या खान ऑफ कलात (Kalat) या राज्याने प्रथम स्वातंत्र्य जाहीर केले, पण 1948 मध्ये पाकिस्तानने सैन्याच्या बळावर बलुचिस्तानला आपल्या देशात सामील करून घेतले. या जबरदस्तीच्या सामील होण्याला बलुच नेत्यांनी कधीच मान्यता दिली नाही, आणि यातूनच स्वातंत्र्याचा संघर्ष सुरू झाला. बलुच नेत्यांचा मुख्य आरोप आहे की पाकिस्तानचे केंद्र सरकार (ज्यावर पंजाबी आणि इतर गटांचे वर्चस्व आहे) बलुचिस्तानला एक वसाहत म्हणून वागवते. 1956 मध्ये पाकिस्तानने ‘वन युनिट’ धोरण लागू केले, ज्यामुळे प्रांतांची स्वायत्तता कमी झाली आणि बलुचिस्तानच्या राजकीय अधिकारांवर गदा आली. बलुच राष्ट्रवादी नेते आणि गट, जसे की बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि बलुचिस्तान लिबरेशन युनायटेड फ्रंट (BLUF), पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करतात. त्यांचे म्हणणे आहे की पाकिस्तानने त्यांच्यावर अन्याय केला आहे आणि त्यांना त्यांचे स्वतःचे भविष्य ठरविण्याचा हक्क आहे.बलुचिस्तानात सर्वाधिक गरिबी, सर्वात कमी साक्षरता दर आणि सर्वात जास्त बालमृत्यू आणि मातामृत्यू दर आहेत. 1970 च्या दशकापासून बलुचिस्तानचा देशाच्या जीडीपीमधील वाटा 4.9% वरून 3.7% वर घसरला आहे. केंद्र सरकारने विकास प्रकल्पांची घोषणा केली असली, तरी त्याचा फारसा परिणाम झालेला नाही.

बलुचितस्तान आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेलेत. त्यामुळे बलुचमधल्या फुटिरतावादी गटांकडून अनेकदा पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करण्यात आलेत.आताही बलुचिस्तानने पाकिस्तानी लष्करावर हल्ला करत, आपला आक्रोश बाहेर काढलाय.दरम्यान भारत आणि पाकमधल्या सध्याच्या तणावात बलुचिस्तानच्या या कृत्यामुळे पाकिस्तानला दुहेरी फटका बसतोय.

SOURCE : ZEE NEWS