Source :- ZEE NEWS
Pakistani soldiers: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आता चांगलाच आक्रमक झालाय. त्यामुळे पाकिस्तान घाबरल्याचं दिसतंय. कारण भारत हल्ला करु शकतो या भीतीने पाकिस्तानी लष्करात राजीनाम्यांचा वर्षाव होतोय. दोन दिवसांत सुमारे पाच हजार जवानांनी नोकरी सोडली आहे. जवानांनी पळ काढल्याने पाकिस्तानची भिस्त आता थकलेल्या घोड्यांवर असल्याचं दिसतंय.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत चांगलाच आक्रमक झालाय. त्यामुळे पाकिस्तान घाबरला असून त्यानं युद्धासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, दुसरीकडे भारत पाकिस्तावर आक्रमण करेल या भीतीनं पाकिस्तानी लष्करातील जवानांनी युद्धाआधीच पळ काढलाय. पाक सैन्यांमध्ये राजीनाम्यांचं सत्र सुरू झालंय.. त्यामुळे पाकिस्तान आता थकडलेल्या घोड्यांना मैदानात उतरवण्याची तयारी करतोय. पाकिस्तान लष्कराकडून माजी सैनिकांना पुन्हा आर्मी जॉईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानचे पत्रकार जावेद चौधरींनी ही माहिती दिलीय..
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी उडालीय. त्यामुळे जवळपास 5 हजारच्या आसपास पाक जवानांनी राजीनामा दिलाय.
250 पाकिस्तान लष्करातील अधिकारी आणि 4 हजार 500 जवानांनी राजीनामा दिलाय. यात इन्फंट्री रेजिमेंटमधून 120 अधिकारी 1200 जवान, माऊंटेन बटालियनमधून 80 अधिकारी 2 हजार जवान, आर्टिलरी रेजिमेंटमधून 50 अधिकारी आणि 1300 जवानांनी राजीनामा दिलाय.
पाकिस्ताननं 40 लाख माजी जवानांना पुन्हा रुजू होण्याचा आदेश दिलाय.मात्र, जवानांनी कधीपासून युद्ध अभ्यास केला नाहीये. त्यामुळे पाकिस्तानला माजी सैनिकांचा फायदा होणार नसल्याचा दावा निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजनांनी केलाय. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानी नेते भारताला धमकावताय. मात्र, दुसरीकडे भारताच्या भीतीमुळे त्यांचे जवान मैदानात उतरण्याआधीच पळ काढताय. त्यामुळे पाकड्यांना आता थकडलेल्या घोड्यांचा आधार घ्यावा लागतोय.
हल्ल्यामागे पाकिस्तानचं, पुरावा आला समोर
पहलगाम हल्ल्यात हात असलेल्या दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराकडून शोध सुरूय.. त्यामुळे भारतानं काश्मीर-पाक सीमेवरील 47 पर्यटन स्थळ देखील बंद केलीयत. तसंच या पाकड्यांना धडा शिवकण्याची तयारी देखील भारताकडून केली जातेय.पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकड्यांचाच हात असल्याचं समोर आलंय.पर्यटकांवर गोळीबार करणारा क्रूरकर्मा हाशिम मुसा हा पाकिस्तानी असल्याचं उघड झालंय. हाशिम मुसा हा पाकिस्तानी लष्कराच्या विशेष दलाचा माजी पॅरा कमांडो आहे. त्याला आयएसआय तसंच लष्कर ए तोयबानं फंडिंग केल्याचीही शक्यता वर्तवण्यात आलीय.
हवाई दलाला कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आता पाकच्या नापाक कारवाया हाणून पाडण्यासाठी सज्ज झालाय. लष्करासोबतच आता नौदल आणि हवाई दलही तोडीस तोड उत्तर देण्यासाठी तयार झालंय.पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने व्हिजा रद्दसह महत्वाचे निर्णय घेतल्याने पाकिस्तान चांगलाच धास्तावलाय. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराने सीमेवर हालचाली वाढवल्यात… पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तोफा आणि शस्त्रास्त्रांची जमवाजमव सुरू आहे. त्यामुळे भारतही पाकला सणसणीत उत्तर देण्यासाठी सर्वबाजूंनी सज्ज झालाय. आतातर हवाई दलाला दोन मिनिटांच्या आत कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे.
SOURCE : ZEE NEWS