Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Reuters
25 मिनिटांपूर्वी
पोप फ्रान्सिस यांचे निधन झाल्यानंतर सर्वांचे लक्ष नवीन पोप कोण होतील याकडे होते. गेल्या काही दिवसांपासून पोप यांची निवड करण्याची प्रक्रिया व्हॅटिकन सिटीमध्ये सुरू होती. केवळ ख्रिश्चन-कॅथलिकच नाही तर सर्वांचेच लक्ष या निवडीकडे होते.
काही क्षणांपूर्वीच नवीन पोप यांची निवड झाल्याचे संकेत व्हॅटिकन सिटीने दिले आहेत. व्हॅटिकनमध्ये असलेल्या चिमनीतून पांढऱ्या रंगाचा धूर निघाला. हे नवीन पोपची निवड झाल्याचे संकेत आहेत.
नवीन पोप थोड्याच वेळात गॅलरीत येऊन भाविकांना अभिवादन करतील.
व्हॅटिकन सिटीच्या आवारात हजारोच्या संख्येनी लोक जमा झाले आहेत आणि पोप यांचा संदेश ऐकण्यासाठी आतूर आहेत.
पोप यांची निवड कार्डिनलद्वारे होत असते. 133 सदस्य असलेल्या कार्डिनलकडून पोप यांची निवड होते.
(ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC