Source :- ZEE NEWS
Jyoti Malhotra: युट्यूबर गुप्तहेर ज्योती मल्होत्रासाठी आता पाकिस्तानी टूलकिट अॅक्टिव्ह झालंय. पाकिस्तानी यूट्यूबर ज्योतीच्या समर्थनार्थ पुढे आलेत. पाकिस्तानी यूट्यूबर हिरा बैतूलनं ज्योतीच्या समर्थनार्थ पोस्ट केलीय. ज्योतीला टार्गेट केलं जात असल्याची पोस्ट हिरानं केलीय. त्यामुळे भारताशी गद्दारी करणा-या ज्योतीचा पाकिस्तान्यांना पुळका आलाय.
पाकिस्तानी टूलकिट सक्रीय
भारताशी गद्दारी करणा-या युट्यूबर गुप्तहेर ज्योती मल्होत्राला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानी युट्यूबर सरसावलेत. भारताची संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणा-या ज्योती मल्होत्राचा पाकड्यांना पुळका आलाय. गद्दारी करणारी ज्योती आमची बहीण असल्याचं पाक युट्यूबर हिरा बैतुलनं म्हटलंय. ज्योती मल्होत्राच्या समर्थनार्थ आता पाकिस्तानी टूलकिट अॅक्टिव्ह झालंय. पाकिस्तानी यूट्यूबर हिरा बैतूलनं ज्योतीच्या समर्थनार्थ पोस्ट केलीय. ज्योतीला टार्गेट केलं जात असल्याची पोस्ट हिरानं केलीय. याच हिरासोबत ज्योतीचा व्हिडिओही समोर आलाय. ज्योतीच्या पाकिस्तान दौ-यादरम्यानचा हा व्हीडिओ असल्याचं समोर आलंय.
अधिकाऱ्यांकडूनच खातिरदारी
यूट्यबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलीय. दरम्यान तिच्या चौकशीतून आता धक्कादायक माहिती समोर आलीय. ज्योतीनं पाकिस्तानच्या आयएसआयकडून पैसे घेतल्याची माहिती समोर आलीय. मागील 2 वर्षात ज्योतीनं तीनवेळा पाकिस्तानचा दौराही केला. दरम्यान या दौऱ्यात तीनं ISIच्या अधिका-यांची भेट घेतली होती. तसंच या अधिका-यांनी तिची चांगलीच खातिरदारी केली होती.
यूट्यूबर गुप्तहेरबद्दल धक्कादायक माहिती
ज्योती मल्होत्रा आयएसआयकडून पैसे घेत होती. पाक दूतावासात ज्योती पाहुणी म्हणून गेली होती. ज्योतीची पाकिस्तानात फिरण्याची व्यवस्था ISIनेच केली होती. हेरगिरीच्या बदल्यात ज्योतीला पैसे मिळत असल्याची माहिती समोर आली. पाकिस्तानी नेत्यांसोबत ज्योतीचे अनेक व्हिडिओ
ISI एजंट अली आणि शाहिदलाही ज्योती भेटली होती. शाहिदचा नंबर जट्ट रंधावा नावानं ज्योतीनं सेव्ह केला होता. भारतविरोधी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा तिच्यावर आरोप आहे. ज्योती पाकिस्तानी उच्चायुक्त दानिशच्या देखील संपर्कात होती. दानिशने ज्योतीला पाकिस्तानचा व्हिसाही दिला होता
छडा लागणं अत्यंत महत्त्वाचं
भारताशी गद्दारी करणा-या ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी बहीण म्हणताहेत. त्यामुळे पहलगामच्या भ्याड हल्ल्यामागे पाकिस्तानच होता हे आता जगजाहीर झालंय. त्याचा बदला भारतानं दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून घेतलाय. आता घरभेदी शोधून काढणं सुरू आहे. ज्योती मल्होत्राच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ज्योतीला यासाठी कुणी मदत केली.यात आणखी कोण सहभागी होतं, याचा छडा लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
SOURCE : ZEE NEWS