Source :- ZEE NEWS
India Pakistan War : भारतानं एअरस्ट्राईक करुन नाक कापलेल्या पाकिस्ताननं भारताशी दोन हात करण्याऐवजी सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा प्रोपोगंडा सुरु केलाय. खोट्या बातम्या दाखवून पाकिस्तानी लोकांची दिशाभूल केली जातेय. हा खोटारडेपणा एवढा टोकाला गेलाय की मुंबईतल्या धारावीतल्या आगीचे व्हिडिओ दाखवून तो हल्ला भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतंय.
भारत-पाकिस्तान तणावामुळे युद्धजन्य परिस्थितीत, सोशल मीडियावर काहीही चुकीचे पोस्ट केले जाऊ नये यासाठी भारतात यंत्रणेनं नागरिकांना सजग राहण्याचा इशारा दिला आहे. पीआयबी फॅक्ट चेक – प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या अधिकृत फॅक्ट चेकिंग सोशल मीडिया हँडल एक्सने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, पाकिस्तान प्रायोजित प्रचार असलेल्या बनावट सोशल मीडिया पोस्टविरुद्ध इशारा देण्यात आला आहे.
दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी भारतानं एअरस्ट्राईक केला. पाकिस्तानला त्यांच्याच देशात घुसून मारलं. भारतानं आपले हक्क, अधिकार, स्वायतत्ता कायम राखण्यासाठी युद्धखोर पाकिस्तानला धडा शिकवला. भारतानं आपल्या नागरिकांच्या रक्षणासाठी कारवाई केली. पण, भारताची विमानं पाडल्याचा दावा केला. हा दावा एवढा खोटा होता की त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेले व्हिडिओच फेक होते.
खोटारडेपणाचा कळस म्हणजे काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या धारावीत सिलेंडर स्फोट झाले होते. एका ट्रकमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचे स्फोट झाले होते. तो व्हिडिओच पाकिस्तानी सोशल मीडिया अकाऊंटवर व्हायरल करण्यात आले. त्या व्हिडिओत सिलेंडरचा तो ट्रक आणि स्फोट झालेले सिलिंडर स्पष्टपणे दिसतात.
यह वीडियो सोशल मीडिया पर तेजी से फैल रहा है, जिसमें दावा किया जा रहा है कि #गुजरात के हजीरा पोर्ट पर हमला हुआ है।#PIBFactCheck
यह एक असंबंधित वीडियो है, जिसकी पुष्टि हो चुकी है कि यह 7 जुलाई 2021 को हुए एक ऑयल टैंकर विस्फोट का है।
कृपया इस वीडियो को साझा न करें। नीचे दिए गए… https://t.co/N3oheYZB9J
— पीआईबी हिंदी (@PIBHindi) May 9, 2025
एक सोशल मीडिया पोस्ट में झूठा दावा किया गया है कि भारतीय सेना ने अंबाला एयरबेस का इस्तेमाल कर अमृतसर और अपने ही नागरिकों पर हमला किया है।
यह दावा पूरी तरह से बेबुनियाद है और एक सुनियोजित भ्रामक प्रचार अभियान का हिस्सा है।
अमृतसर पर पाकिस्तान के हमले के… https://t.co/3rRXaeiLcj
— पीआईबी हिंदी (@PIBHindi) May 8, 2025
धारावी सिलेंडर स्फोटाचा व्हिडिओ पाकिस्तानी फेसबुक अकाऊंटवर अपलोड केलेला हा व्हिडिओ च नव्हे, तर पाकिस्तानी ब्लॉगर्स छातीठोकपणे पाकिस्तानी सैन्य भारतात घुसल्याचा दावा केलाय. कळस म्हणजे श्रीनगर एअरपोर्टवर पाकिस्तानी सैन्यानं हल्ला केल्याचा दावाही तो ब्लॉगर करत आहे.
पीआयबीनं नुकताच आणखी एख व्हिडीओ फेक असल्याचं सांग हा व्हिडीओ गुजरातवरील कोणा बंदरावरील हल्ल्याचा नसून एला ऑइल टँकरच्या स्फोटाचा असल्याचंही सांगण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर याहून कमाल म्हणजे पाकिस्ताननं भारताची राफेल विमानं पाडल्याचा खोटा दावा केला आहे. ते दाखवण्यासाठी जुनी दुस-या महायुद्धातलं विमान जळाल्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन रिलीज केलीयेत.
SOURCE : ZEE NEWS