Source :- ZEE NEWS
Oldest Ant Discovery: कैक हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर ज्या प्रजातींचं अस्तित्वं होतं, त्याचा शोध आजवर बहुविध संशोधनांतून लावण्यात आला. या संशोधनांनुसार डायनासोर आणि त्याच्या इतर प्रजातींसंदर्भातील थक्क करणारी माहिती जगासमोर आली आणि आता म्हणे याच कालखंडातील आणखी एका जीवाचे अवशेष संशोधनातून समोर आले आहेत.
हेल अँट
हा जीव म्हणजे इवलिशी मुंगी. आश्चर्य वाटतंय ना? तब्बल 113 वर्षांपूर्वीच्या आणि चक्क महाकाय डायनासोरच्या कालखंडात वावरलेल्या मुंगीचे अवशेष ब्राझिलच्या उत्तर पूर्व क्षेत्रात सापडले आहेत. संशोधकांनी या मुंलीला ‘हेल अँट’ असं नाव दिलं आहे. आतापर्यंतच्या अवशेषांपैकी ही मुंगी जगातील सर्वात जुनी अर्थात सर्वात म्हातारी मुंगी ठरली आहे.
हेल अँटच्या या संशोधनासंदर्भातील सविस्तर माहिती ‘करंट बायोलॉजी’ नावाच्या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही मुंगी अथवा तिचे अवशेष एका चुनखडकात सापडले असून, यापूर्वी सापडलेल्या मुंगीचे अवशेष एम्बरमध्ये सापडले होते. फ्रान्स आणि म्यानमार इथून हे अवशेष मिळाल्याचं सांगण्यात येतं. मुंगीचे हे अवशेष पाहता पृथ्वीरील जीवसृष्टीच्या विकासाचा आलेख जवळून पाहण्याची संधी आणि काही नवे निष्कर्ष समोर आणत आहे.
एंडरसन लेपेको आणि त्यांच्या टीमनं हे संशोधन केलं असून, ब्राझिलच्या ‘क्रेटो फॉर्मेशन’ इथून हे अवशेष प्राप्त करण्यात आले. जीवाश्म संरक्षणासाठी हा भाग ओळखला जात असून, एखाद्या डोंगरामधून इतक्या जुन्या मुंगीचे अवशेष मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं ते म्हणाले.
मुंगीची शारीरिक रचना
या मुंगीच्या शारीरिक रचनेविषयी सांगावं तर, तिच्या जबड्याची एक विशिष्ठ रचना होती, ज्यामुळं ही मुंगी सहजपणे शिकार करू शकत होती. मायक्रो सिटीस्कॅनिंगच्या तंत्रानं संशोधकांच्या टीमनं मुंगीच्या शरीराचं 3डी इमेजिंग केलं आणि त्यानंतर समोर आलेले संदर्भ थक्क करणारे होते. मुंगीची पचनसंस्था अतिशय क्लिष्ट असून त्यातूनच त्या कालखंडा मुंग्या शिकार करत असल्याचं स्पष्ट झालं.
SOURCE : ZEE NEWS