Home world news marathi किंंमत 550000000 रुपये; 18 कॅरेट शुद्ध सोन्याचे टॉयलेट फक्त 5 मिनिटांत चोरले;...

किंंमत 550000000 रुपये; 18 कॅरेट शुद्ध सोन्याचे टॉयलेट फक्त 5 मिनिटांत चोरले; आजपर्यंतची सर्वात शॉकिंग चोरी

7
0

Source :- ZEE NEWS

Gold Toilet Worth Rs 55 Crores Was Stolen Within 5 Minutes : सोनं, हिरे, चांदी, रोकड यासह अनेक मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याच्या अनके घटना नेहमीच घडत असतात.  पण तुम्ही कधी टॉयलेट सीट चोरीला गेल्याचे ऐकले आहे का? प्रश्न थोडा विचित्र वाटतोय ना? पण हे खरं आहे. चोरट्यांनी  18 कॅरेट शुद्ध सोन्याचे टॉयलेट चोरले आहे. याची किंमत 550000000 रुपये आहे. चोरांनी हे टॉयलेट फक्त  5 मिनिटांत चोरले आहे. आजपर्यंतची सर्वात शॉकिंग चोरी मानली जात आहे. 

14 सप्टेंबर 2019 रोजी हे सोन्याचे टॉयलेट चोरीला गेले. इंग्लंडमधील ऑक्सफर्डशायरमधील ब्लेनहाइम पॅलेसमध्ये ही चोरीची घटना घडली. पहाटेच्या सुमारास काच फुटल्याच्या आवाजाने राजवाड्यात काम करणारी एलेनोर पेस नावाची एक महिला गाढ झोपेत असताना तिला जाग आली. सुरुवातीला तिला वाटले की कदाचित काही भांडी पडली असतील. पण सुरक्षा अलार्म वाजताच तिचे हृदय जोरात धडधडू लागले. ती धावत आली आणि आत जाऊन पाहिले तेव्हा तिच्या पायाखालून जमीन सरकली. राजवाड्यातून 18 कॅरेट सोन्याचे टॉयलेट चोरीला गेले होते. 

या टॉयलेटची किंमत सुमारे 4.8 दशलक्ष पौंड (सुमारे 55 कोटी रुपये) होती. चोरीची बातमी कळताच खळबळ उडाली. हे टॉयलेट सीट प्रदर्शन म्हणून राजवाड्यात ठेवण्यात आले होते. पोलिसांना या प्रकरणाची तात्काळ माहिती देण्यात आली. अंधाराचा फायदा घेत पाच चोर राजवाड्यात घुसले आणि सोन्याचे टॉयलेट चोरून नेले. राजवाड्यातून बाहेर पडल्यानंतर चोरांनी चोरुन आणलेल्या एका कारमध्ये हे टॉयलेट ठेवले आणि पळून गेले. पोलिस तपासात असे दिसून आले की चोरांना राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी फक्त पाच मिनिटे लागली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला, परंतु अनेक वर्षे चोरांचा कोणताही सुगावा लागला नाही. अखेर पाच वर्षांनंतर पोलिसांना यश आले. टॉयलेट चोरणाऱ्या  चार आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात तिघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आणि एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आता सोन्याच्या शौचालयाच्या चोरीच्या या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे . खरं तर, सोन्याचे शौचालय चोरीच्या कटात सहभागी असलेल्या तीन चोरांपैकी एकाला तुरुंगात जाण्यापासून वाचवण्यात आले आहे.

एक आरोपी का पळून गेला?

न्यायालयाने या तिसऱ्या व्यक्तीला निलंबित शिक्षा सुनावली आहे. फ्रेडरिक डो नावाच्या या व्यक्तीला चोरी प्रकरणात केवळ मध्यस्थीची भूमिका बजावल्याबद्दल दोषी आढळून आले आहे. त्याला 21 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि ही शिक्षा दोन वर्षांसाठी स्थगित करण्यात आली आहे. त्याला २४० तास विनावेतन काम करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या प्रकरणात जेम्स शीन आणि मायकेल जोन्स यांना चोरीचा मुख्य आरोपी म्हणून शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याच वेळी, बोरा गुक्कुक नावाच्या एका आरोपीला निर्दोष सोडण्यात आले.

चोरीनंतर चोरट्यांनी टॉयलेट फोडले किंवा ते वितळवून विकले. सोन्याच्या शौचालयाचा कोणताही भाग जप्त करता आला नाही. न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे, फ्रेडरिक डोला चोरीत सहभागी असलेला मुख्य आरोपी मानला गेला नाही. न्यायालयाचा असा विश्वास होता की फ्रेडरिक हॅटन गार्डन परिसरातील लोकांना ओळखत होता जे चोरीचे सोने खरेदी करायचे. या कारणास्तव, चोरट्यांनी त्याला त्यांच्यासोबत समाविष्ट केले.

चोरांनी सोन्याचे शौचालय कसे चोरले?

पोलिस तपासादरम्यान, या शौचालयाच्या चोरीबद्दल काही अतिशय धक्कादायक तथ्ये आढळून आली. राजवाड्यातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना इतर कलाकृतींबद्दल जास्त काळजी होती. कारण त्यांना शौचालयाची किंमत माहित नव्हती. प्रदर्शन संपल्यानंतर, ते सुरक्षारक्षकांशिवाय शौचालयातून निघून गेले . तेथे कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नव्हते. गस्त नव्हती आणि दरवाजे सहजपणे तोडता येत होते. चोरांनी राजवाड्याच्या या कमकुवतपणाचा फायदा घेतला.

SOURCE : ZEE NEWS