Home world news marathi औरंगजेबला आदर्श मानणाऱ्या पाकिस्तानात आता त्याच्यावरूनच मोठा वाद! जे काही सुरू आहे...

औरंगजेबला आदर्श मानणाऱ्या पाकिस्तानात आता त्याच्यावरूनच मोठा वाद! जे काही सुरू आहे ते जाणून शॉक व्हाल

3
0

Source :- ZEE NEWS

Pakistanis React on Aurangzeb Controversy: सर्वात क्रूर शासक म्हणून भारतीय मुघल सम्राट औरंगजेबचा द्वेष करतात. पाकिस्तानातील लोक मात्र, औरंगजेबला आपला आदर्श मानतात. औरंगजेबला आदर्श मानणारे औरंगजेबचा तिरस्कार करत आहेत. थोडक्यात काय तर आता पाकिस्तानातही औरंगजेबवरुन वाद सुरु झाला आहे. या वादामागचे कारण जाणून शॉक व्हाल. 

भारतात लोक औरंगजेबाला एक क्रूर आणि धर्मांध शासक मानतात. औरंगजेबने मंदिरे उद्ध्वस्त केली, हिंदूंवर अत्याचार केले, म्हणून त्याची प्रतिमा येथे नकारात्मक आहे. औरंगजेबाने त्याचे वडील शाहजहान यांना कैद केले. भाऊ दारा शिकोह याची हत्या केली. औरंगजेबने बादशाहचा ताज वडिलांकडून हिसकावून घेतला. यामुळेच औरंगजेब हा सत्तेचा लोभी आणि भारतातील सर्वात निर्दयी राजा म्हणून ओळखला जाऊ लागला. 

याउलट पाकिस्तानात मात्र, औरंगजेबला आदर्श मानले जाते. धर्म इतर सर्व गोष्टींपेक्षा वरचढ मानला असे येथील लोकांना वाटते. यामुळेच औरंगजेब यांच्यासाठी आदर्श राजा आहे.  पाकिस्तानचे कट्टरपंथी औरंगजेबाच्या इस्लामिक धोरणांचे कौतुक करतात. औरंगजेबने शरियाची कडक अंमलबजावणी करून इस्लामची सेवा केली असा  त्यांचा विश्वास आहे.

औरंगजेबवरुन पाकिस्तानात वाद

आता मात्र, औरंगजेबवरुन पाकिस्तानात वाद सुरु झाला आहे. औरंगजेबाला आदर्श मानणारे त्याचे पाकिस्तानी समर्थक आता त्यालाच जुलमी, खुनी, धर्मांध, क्रूर आणि व्यभिचारी म्हणत आहेत. पाकिस्तानातील मुल्ला आणि मौलवी औरंगजेबच्या कुकर्माचा पाढाच वाचत आहेत.  या मौलांनांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.  ज्याने आपल्या वडिलांचा आदर केला… इतिहासाने त्याला दोष दिला… त्याने स्वतःच्या वडिलांना तुरुंगात टाकले… त्यांची हत्या केली तो आदर्श कसा असू शकतो असा प्रश्न मौलाना उपस्थित करत आहेत. औरंगजेब हा एक कट्टरपंथी शासक होता. ज्याचा एकच उद्देश होता. जो कोणी इस्लामच्या मार्गात येईल त्याला ठार करा. धर्म आणि इस्लामच्या नावाखाली अनेक मौलाना औरंगजेबसारख्या क्रूर शासकाला खलनायकातून नायक बनवण्याचा प्र.त्न करत असल्याचा आरोप मौलाना करत आहेत. 

SOURCE : ZEE NEWS