Source :- ZEE NEWS
Jeffrey Epstein Baby Ranch Plan: अमेरिकेतील गुन्हेगार जेफरी एपस्टीनच्या अनेक फाईल्स उघडल्यानंतर जग हादरलं आहे. 2019 रोजी जेलमध्ये आत्महत्या करणाऱ्या एपस्टीनसंदर्भात आता आणखी एक खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला डीएनच्या आधारे सुपर रेस सुरु करायची होती.
रिपोर्ट्सनुसार, एपस्टीन न्यू मेक्सिकोतील आपल्या अलिशान फार्महाऊसमध्ये (Ranch) महिलांना प्रेग्नंट करु इच्छित होता. त्याला जास्तीत जास्त महिलांना प्रेग्नंट करायचं होतं, जेणेकरुन मोठ्या संख्येने मुलं जन्माला घालता येतील. त्याला एकाच वेळी 20 महिलांना प्रेग्नंट करायचं होतं, कारण त्याची डीएनएमधून एक सुपर रेस सुरु करण्याची इच्छा होती. त्याने यासंदर्भात अनेक वैज्ञानिकांशी सल्लामसलत केली होती.
एपस्टीनची ही विचारसरणी ट्रान्सह्युमनिजमशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. ही एक अशी विचारसरणी आहे ज्यामध्ये तंत्रज्ञान, जेनेटिक बदल आणि ऑर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून माणसांची ताकद वाढवण्यावर चर्चा होती. टीकाकारांचं म्हणणं आहे की, अशा प्रकारची विचारसरणी युजिनिक्स सारखी आहे, ज्यामध्ये काही मोजक्या लोकांच्या माध्यमातून मानवजातीला ‘उत्तम’ बनवण्याबद्दल चर्चा होते. याच विचारसरणीचा वापर नंतर नाजींनी केला होता.
एपस्टीनचा बेबी रँच प्लॅन काय होता?
एपस्टीनला न्यू मेक्सिकोमधील आपल्या रँचला प्रजनन केंद्रात बदलायचं होतं. त्याची इच्छा होती की, त्याच्या सीमेनमधून त्याच्यासारखे चांगला IQ आणि चांगले जनुक असलेली मुले जन्माला यावीत. रिपोर्टनुसार, एपस्टीन वारंवार हा दावा करायचा की त्याला आपल्या सीमेनमधून अधिकाधिक महिलांना गर्भवती करायची इच्छा होती.
2000 च्या सुरुवातीच्य वर्षांमध्ये एपस्टीनने वैज्ञानिक आणि उद्योगक्षेत्राशी संबंधित लोकांना आपल्याला सांता फे के जवळ आपल्या रँचला या योजनेचं केंद्र बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
तपासातील अहवालानुसार, एपस्टीन महिलांना रँचवर घेऊन जाण्याचा, तिथेच राहण्याचा आणि गर्भवती बनवण्यासंदर्भातील चर्चेत रस दाखवायचा. पण ही योजना लागू होण्यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे कधी समोर आले नाहीत.
SOURCE : ZEE NEWS