Home world news marathi आणखी एक गौप्यस्फोट! जेफ्री एपस्टीनच्या ‘रेड रुम’ची काळी बाजू समोर; महिलांनी….

आणखी एक गौप्यस्फोट! जेफ्री एपस्टीनच्या ‘रेड रुम’ची काळी बाजू समोर; महिलांनी….

12
0

Source :- ZEE NEWS

Jeffrey Epstein Files: अमेरिकेसह संपूर्ण जगभरात खळबळ माजवणाऱ्या जेफ्री एपस्टीन प्रकरणी दर दिवशी एक नवा खुलासा होत असून त्यास कारण ठरत आहे ते म्हणजे अमेरिकी न्यायव्यवस्थेकडून जारी केले जाणारे काही पुरावे. अर्थात एपस्टीन फाईल्स (Epstein Files). लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीतील आरोपी आणि कधीकाळचा अब्जाधीश जेप्री एपस्टीन याच्या विश्वात डोकावण्याची संधी संपूर्ण जगाला या पुराव्यांमुळं मिळाली आणि पाहणाऱ्या प्रत्येकालाच हादरा बसला. अनेक दिग्गजांच्या नावांचा उल्लेख ‘जेफ्री एपस्टीन फाईल्स’मध्ये पाहायला मिळाला आणि ज्यामुळं हे जाळं नेमकं कुठवर पसरलं होतं याचा तर्क लावूनही यंत्रणांना धक्का बसला. यातच नव्यानं खुलासा झाला तो म्हणजे एपस्टीनच्या ‘रेड रुम’चा.

Add Zee News as a Preferred Source

एपस्टीनच्या ‘रेड रुम’चं रहस्य आहे तरी काय? 

उपलब्ध माहिती आणि काही पुराव्यांनुसार एपस्टीननं त्याच्या लालसा पूर्ण करण्यासाठी ‘रेड रुम’ तयार केला होता. या खोलीत एपस्टीनच्या धनाढ्य पाहुण्यांसाठी महिला, मुली प्रायव्हेट डान्स आणि तत्सम कृत्य, कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असे. हा ‘रेड रूम’ एपस्टीननं त्याच्या पॅरिसमधील घरात तयार करून घेतला होता. 

‘रेड रुम’मध्ये नेमकं काय व्हायचं? 

एपस्टीनच्या या गुप्त आणि संशयास्पद खोलीमध्ये महिलांचा प्रायव्हेट डान्स होत असे. काही माध्यमांच्या वृत्तांनुसार या खोलीतून पीटर मंडेलसन यांच्या अंतर्वस्त्रांचे फोटोही टीपण्यात आले. जेफ्रीच्या ज्या पॅरिसच्या घरात हा रेड रुम होता, त्या फ्लॅटला ‘पापांचं घर’ अर्थात दुष्कृत्यांचं घर म्हणूनही संबोधण्यात आलं. वाचून धक्का बसेल मात्र काही वृत्तांनुसार याच रेड रुममध्ये काही प्रतिष्ठीत महिलांनीही इथं विवस्त्र नृत्य केलं आहे. इतकंच नव्हे, तर ही तिच खोली आहे जिथं एपस्टीननं विचारही करणं अशक्य होईल इतके लैंगिक अत्याचार केल्याचं म्हटलं जातं. 

हा आलिशान फ्लॅट पॅरिसच्या आर्क डी ट्रायम्फमध्ये असून तिथं माणुसकीच्या अनेक मर्यादा ओलांडण्यात आल्या. ही तिच जागा आहे जिथं एपस्टीन अँड्र्यू माउंटबेटन-विंडसरसारख्या व्यक्तींसाठी ‘मनोरंजनात्मक’ कार्यक्रमांचं आयोजन करत असे. अमेरिकी न्यायव्यवस्थेनं नुकत्याच जारी केलेल्या पुराव्यांमध्ये अनेक फोटो एपस्टीनच्या याच रेड रुमचे असल्याचंही उघडकीस आलं. 

फोटोंमध्ये नेमकं काय दिसलं? 

जारी करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये महिलांचे चेहरे धुसर दिसत आहेत, त्यांचं वय इथं स्पष्ट दिसत नाही. मात्र या महिला अतिशय किमान कपड्यांमध्ये दिसत आहेत. इतकंच नव्हे, तर या खोलीत नृत्य करताना या महिला विवस्त्र होताना दिसत आहेत. या रेड रुममध्ये चित्रीत करण्यात आलेले व्हिडीओ विविध दिवसांचे आणि विविध वेळांचे असल्याचं सांगण्यात येतं. 

 

पुढे या फ्लॅटचं, रेड रुमचं काय झालं? 

2003- 2004 च्या एका बँक स्टेटमेंटमध्ये झालेला खुलासा पाहता, एपस्टीकडूनएकूण 75000 अमेरिकी डॉलरचा फायदा मेंडेलसनना झाला होता इतकंच नव्हे तर एपस्टीननं त्यांचे इतरही खर्च केले होते. मेंडेलसन यांच्या दाव्यानुसार या फ्लॅटमध्ये आपली अंतर्वस्त्रं नेमकी कुठून आली याची कल्पना नव्हती. एपस्टीनचा हाच रेड रुम असणारा फ्लॅट बल्गेरियाई प्लास्टिक पॅकेजिंग टायकून जॉर्जी टुचेव यांनी 82 लाख पाऊंड इतक्या मोठ्या रकमेत खरेदी केला. 

SOURCE : ZEE NEWS