Source :- ZEE NEWS
Elon Musk Vs Donald Trump: (USA President) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि (Tesla) टेस्लासह X चे महत्त्वाचे अधिकार असणारे सर्वेसर्वा, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारे, ट्रम्प यांचे निकटवर्तीय एलॉन मस्क यांच्यातील मैत्रीपूर्ण नात्यात तणाव निर्माण झाल्याची परिस्थिती आता पाहायला मिळत आहे. ट्रम्प प्रशासनातून अधिकारमुक्त झाल्यानंतर आता मस्क आणि ट्रम्प यांच्यातील मतभेद अधिकच स्पष्टपणे जगासमोर येत आहेत.
मी नसतो, तर…
मस्क यांनी नुकतीच केलेली सोशल मीडिया पोस्ट पाहता त्यांच्या बोलण्याचा रोख नव्या राजकीय पक्षाच्या स्थापनेकडे असल्याचंही पाहायला मिळत आहे. यासाठी X च्या माध्यमातून ‘पोल’ घेत मस्क यांनी जनसामान्यांचीच मतं मागवली आहेत, ज्यामुळं ट्रम्प यांना हा एक मोठा धक्का देणारा निर्णय ठरु शकतो. मस्क यांनी सध्या ट्रम्प यांच्या काही निर्णयांचा स्पष्टपणे विरोध केला असून, त्यांच्या ‘Big Beautiful Bill’वरही कडाडून टीका करत, ‘मी नसतो, तर ते (ट्रम्प) निवडणूकच जिंकले नसते’ असा दावाही केला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी पार पडेलल्या निवडणुकीदरम्यान आपली साथ नसती तर ट्रम्प यांना पराभवाचा सामना करावा लागला असता, हे जळजळीत वक्तव्य करणारे मस्क सध्या जागतिक स्तरावर माध्यमांचं लक्ष वेधत आहेत. इतक्यावरच न थांबचा मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची एक जुनी सोशल मीडिया पोस्टसुद्धा शेअर केली. ‘मला विश्वास बसत नाहीये, की रिपब्लिकन कर्जाची सीमा वाढवत आहेत. मी स्वत: रिपब्लिकन आगे आणि मलाच आता खजिल झाल्यासारखं वाटत आहे’, अशा आशयाची एक पोस्ट ट्रम्प यांनी 2013 मध्ये केली होती, जी पुन्हा एकदा मस्क यांनी शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Is it time to create a new political party in America that actually represents the 80% in the middle?
— Elon Musk (@elonmusk) June 5, 2025
1992 मधील एक प्रायव्हेट पार्टी व्हिडीओ
डोनाल्ड ट्रम्प यांचा 1992 मधील एक प्रायव्हेट पार्टी व्हिडीओसुद्धा मस्क यांनी समोर आणला. एका दुसऱ्याच अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला व्हायरल व्हिडीओ त्यांनी रिशेअर केला जिथं ट्रम्प जेफरी एप्सिटीनसोबत तेव्हा पार्टी करताना दिसले होते. त्यामुळं आता मस्क आणि ट्रम्प यांच्यातील हे द्वंद्व अतिशय गंभीर वळणावर आल्याचं स्पष्ट होत आहे.
— Elon Musk (@elonmusk) June 5, 2025
हा वाद नेमका कधी मिटणार? की तो आणखी भडकणार?
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉम मस्क यांच्यामध्ये कर आणि खर्चासंदर्भातीव विधेयकावरून मतभेद असून, आता शाब्दिक बाचाबाचीमुळं या मतभेदाला वादाचं रुप मिळताना दिसत आहे. फक्त मस्क नव्हे, तर खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा मस्क यांच्यावर नाराजी व्यक्त करत, मी त्यांची कामयच मदत केली आहे असं म्हटलं. ओवल ऑफिसमध्येसुद्धा आपल्याच फार चांगलं नातं असल्याचं म्हटल्याचा दाखला देत इथून पुढं मात्र हे नातं तसं राहील की नाही हे ठाऊक नसल्याचं सूचक विधानही ट्रम्प यांनी केलं. त्यामुळं कधीकाधी एकमेकांटे चांगले मित्र असणारे ट्रम्प आणि मस्क सध्यातरी पक्के वैरी असल्यासारखेच वागत असून, हा वाद नेमका कधी मिटणार? की तो आणखी भडकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
SOURCE : ZEE NEWS