Home LATEST NEWS ताजी बातमी अजित पवार यांच्या विमान अपघाताचा नवा CCTV व्हीडिओ समोर

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा नवा CCTV व्हीडिओ समोर

9
0

Source :- BBC INDIA NEWS

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा नवा CCTV व्हीडिओ समोर

8 तासांपूर्वी

बारामतीच्या धावपट्टीजवळ विमान कोसळताचाना हा व्हीडिओ काल (10 फेब्रुवारी) आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दाखवला.

या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्या अपघातानं उपस्थित झालेले काही प्रश्न मांडत रोहित पवार यांनी या विमानाची मालक कंपनी असलेल्या व्हीएसआर एव्हिएशनच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यावर व्हीएसआरची प्रतिक्रिया अजून मिळालेली नाही

मात्र, डीजीसीएनं व्हीएसआरसह आणखी चौदा चार्टर विमानसेवांचं ऑडिट म्हणजे तपासणी 4 फेब्रुवारीलाच सुरू केली आहे. त्या कंपन्यांची यादी डीजीसीएनं काल ट्विटरवर जाहीर केली.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू अपघाताने झाला नसून, तो घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

रोहित पवार यांनी आज (10 फेब्रुवारी) प्रसारमाध्यमांसमोर एक प्रझेंटेशन सादर करत, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले.

रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत-जामखेड (अहिल्यानगर) मतदारसंघातील आमदार आहेत. तसंच, ते अजित पवार यांचे पुतणे आहेत.

अजित पवार यांच्या विमान अपघातासंबंधी विविध माध्यमातून माहिती मिळवल्याचं सांगत, रोहित पवारांनी प्रामुख्यानं व्हीएसआर ही विमान कंपनी, अ‍ॅरो ही हँडलर कंपनी आणि विमानाचे मुख्य पायलट कॅप्टन सुमीत कपूर या तिघांवर संशय व्यक्त केला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC