Home world news marathi सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज! पुन्हा एकदा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले? एक मोठा...

सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज! पुन्हा एकदा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले? एक मोठा भूभाग स्वतंत्र देश म्हणून जाहीर झाला?

7
0

Source :- ZEE NEWS

Republic of Balochistan Independence From Pakistan : भारताच्या प्रतिहल्ले झेलेत असतानाच आता पाकिस्तान अंतर्गत कलहामुळे आणखीनच अडचणीत आला. बलुच आर्मीने बलुचिस्तान वेगळं करण्याच्या मागणीसाठी पाकिस्तानी सैन्यावरील हल्ले पुन्हा एकदा वाढवलेत. बलुच आर्मीने पाकवर हल्ले सुरुच ठेवलेत. भारतापाठोपाठ बलुच आर्मीच्या हल्ल्यांनी आता पाक सैनिकांची सळो की पळो करुन सोडले. अशातच आता एक मोठी ब्रकिेंग न्यूज समोर आली आहे . बलोचिस्तानने पाकिस्तानपासून स्वातंत्र्य जाहीर केले आहे.

बलोचिस्तानचे नेते मीर यार बलोच यांनी  9 मे 2025  पाकिस्तानपासून बलोचिस्तानचे स्वातंत्र्य जाहीर केले आहे. त्यांनी भारताला बलोचिस्तानला ओळख देण्याचे आणि नवी दिल्लीत दूतावास उघडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, संयुक्त राष्ट्रांकडून शांतितंत्र्य पाठवण्याची आणि पाकिस्तानी लष्कराला माघार घेण्याची मागणी केली आहे.

मीर यार बलोच यांनी ट्वीट करून माहिती दिली की बलोचिस्तानचे स्वातंत्र्य हे आमच्या लोकांसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. आम्ही भारतासारख्या मित्र राष्ट्रांकडून पाठिंबा अपेक्षित करतो, जे आमच्या न्याय्य लढ्याला समर्थन देऊ शकतात.
संयुक्त राष्ट्रांनी या संघर्षात आम्हाला शांतितंत्र्य पाठवून आम्हाला मदत करावी, जेणेकरून आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा मार्ग सुरक्षित करू शकू.

बलोचिस्तान हे पाकिस्तानचे सर्वात मोठे प्रांत असूनही, तेथील विकास आणि लोकसंख्या कमी आहे. या प्रदेशात अनेक दशकांपासून वेगवेगळ्या गटांकडून स्वातंत्र्याच्या मागण्या होत आहेत. भारत, पाकिस्तान फाळणीपासूनच स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी होतेय. बलुचिस्तानचा संमतीशिवाय पाकिस्तानमध्ये समावेश करण्यात आला. बलुचिस्तानमधील साधनसंपत्तीचा पाकिस्तान वापर करतं मात्र बलुचिस्तानच्या विकासाकडे दुर्लक्ष कर. आणि याच द्वेषातून 70च्या दशकात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची स्थापना झाली. आणि तेव्हापासून बलोच आर्मी आणि पाकिस्तानी सैन्यातील संघर्ष सुरूच आहे.

1971 मध्ये बांग्लादेश मुक्ती युद्धानंतर पाकिस्तानचे 2 तुकडे झाले आणि बांग्लादेश अस्तित्वात आला. आता पुन्हा एकदा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आहे. पाकिस्तानचे तीन तुकडे होण्याचा कारण ठरणार आहे ती म्हणजे पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील बलोच आर्मी.

भारताने पाकिस्तानवर हल्ले सुरू केल्यानंतर बलोच आर्मीनंही पाकिस्तानला घेरण्यास सुरुवात केलीये. बलोच लिबरेशन आर्मी अर्थात बीएलएने बलुचिस्तानच्या एक तृतीयंश भागावर ताबा मिळवल्याचा दावा केला. बलोच आर्मीने तब्बल 39 ठिकाणी हल्ला केला. बलोच आर्मीकडून रिमोट कंट्रोल आयईडी बॉम्ब, गोळीबार सातत्याने सुरू आहे.  

SOURCE : ZEE NEWS