Source :- ZEE NEWS
Columbian Senator Shot: कोलंबियातील राष्ट्रपती पदाचे उम्मेदवार आणि सीनेटर मुगुएल उरीबे यांच्यावर एका कार्यक्रमादरम्यान जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्याचे समोर आले आहे. सीनेटर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याप्रकरणी बोगोटाचे महापौर कार्लोस गॅलन यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हल्लेखोराला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. तसंच, सर्व रुग्णालयाही अलर्ट करण्यात आलं आहे.
सीनेटर मुगुएल उरीबे यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रोने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवर पोस्ट केली आहे, ‘मला नाही माहिती तुमचं दुखः कसं कमी करता येईल. हे दुखः आपल्या जखमी मातृभूमीचं आहे.’ असं त्यांनी म्हटलं आहे. तर एकीकडे कोलंबियाई सरकारनेदेखील उरीबे यांच्यावरील हल्ल्यांवर टीका करत एक पोस्ट जारी केली आहे. देशातील डेमोक्रेटिक सेंटर पार्टीने एक वक्तव्य जारी करत हा हल्ला क्रूर असल्याचे म्हटलं आहे. पक्षाने म्हटलं आहे की, हल्ला फोंटिबोन शेजारील एका पब्लिक पार्कमध्ये झाला होता. शस्त्रधारी हल्लेखोरांनी उरीबो यांच्यावर पाठीमागून गोळी चालवली.
कोण आहेत मिगुएल उरीबे टर्बे?
39 वर्षांचे मिगुएल उरीबे टर्बे डेमोक्रेटिक सेंटर पार्टीचे सदस्य आहेत. ते कोलंबियाचे प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. 2024 मध्ये त्यांनी कोलंबियाचे राष्ट्रपती पदासाठी त्यांची उमेदवारी घोषित केली होती. मिगुएल उरीबे यांना एक तरुण आणि गतिमान नेता म्हणून पाहिले जाते. त्यांची राजकीय कारकीर्द खूप वेगाने पुढे जात आहे. उरीबेची आई डायना टर्बे ही एक धाडसी पत्रकार होती. १९९१ मध्ये ड्रग माफिया पाब्लो एस्कोबारच्या मेडेलिन कार्टेलने त्याचे अपहरण केले होते. अपहरणानंतर बचाव मोहिमेत त्यांचा मृत्यू झाला.
Urgente
Aquí está el momento del atentado al Dr Miguel Uribe
Que dolor de Patria
Gobierno miserable !Imágenes sensibles pic.twitter.com/tA3VWGap5V
— Luis Aníbal Rincón Arguello. (@Rincon001A) June 7, 2025
कोलंबियामधील निवडणुका
कोलंबियामध्ये पुढील वर्षी म्हणजेच मे 2026 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. तर मिगुएल उरीबे हे या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जातात. ते देशभरात सतत निवडणूक सभा घेत आहेत. सध्या उरीबेची प्रकृती खूपच गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
SOURCE : ZEE NEWS