Home LATEST NEWS ताजी बातमी मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या काळात शेतकऱ्यांचं उत्पन्न 126 टक्क्यांनी वाढल्याचा दावा किती...

मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या काळात शेतकऱ्यांचं उत्पन्न 126 टक्क्यांनी वाढल्याचा दावा किती खरा?

9
0

Source :- BBC INDIA NEWS

मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या काळात शेतकऱ्यांचं उत्पन्न 126 टक्क्यांनी वाढल्याचा दावा किती खरा?

8 तासांपूर्वी

“2014-15 ते 2023-24 या 10 वर्षांत शेतकऱ्यांचं उत्पन्न एकूण 126 टक्क्यांनी वाढलंय. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या सरकारी आश्वासनापेक्षा ते 26 टक्क्यांनी अधिक आहे,” असा दावा नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया म्हणजेच नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी केलाय.

रमेश चंद यांच्या ‘अ‍ॅग्रिकल्चर इन मिटिंग अ‍ॅस्पिरेशन्स ऑफ रायझिंग इंडिया’ या नावानं प्रकाशित अहवालात हा दावा करण्यात आलाय.

त्यांनी ज्या कालावधीबद्दल हा दावा केलाय, म्हणजे 2014 ते 2024 या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भाजपप्रणित एनडीएचं सरकार देशात सत्तेत आहे.

2014-15 ते 2023-24 या 10 वर्षांत शेतीतून मिळणारं शेतकऱ्यांचं उत्पन्न प्रतिवर्ष 10 टक्क्यांहून अधिकनं वाढलंय, असाही दावा या अहवालात करण्यात आलाय.

प्रत्यक्षात शेतकरी आणि कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक हा दावा खोडून काढताहेत.

  • रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
  • कॅमेरा – किरण साकळे
  • एडिट – अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC