Home LATEST NEWS ताजी बातमी महात्मा फुलेंचा तेलंगणातील पुतळा हटवण्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं? – ग्राऊंड रिपोर्ट

महात्मा फुलेंचा तेलंगणातील पुतळा हटवण्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं? – ग्राऊंड रिपोर्ट

9
0

Source :- BBC INDIA NEWS

महात्मा जोतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांवरून हैदराबादमध्ये वाद निर्माण झाला आहे.

महात्मा जोतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांवरून तेलंगणात वाद निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा हटवण्यात येत असल्याचा एक व्हीडिओ तेलंगणात व्हायरल झाला होता.

त्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्रातील मंत्री छगन भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी निषेध व्यक्त केला आहे.

छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून दोषींवर कारवाई करण्याची, तसेच महात्मा फुलेंचा पुतळा सन्मानपूर्वक प्रस्थापित करण्याची मागणी केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

महात्मा फुले यांचा नुकताच बसवलेला पुतळा काढून टाकण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे.

खरं तर, सध्या महात्मा फुले यांचा पुतळा तिथेच आहे. तो पूर्णत: हटवण्यात आलेला नाहीये.

महात्मा फुले यांचा नुकताच बसवलेला पुतळा काढून टाकण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे.

फोटो स्रोत, UGC

परंतु, तो हटवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादामुळे आता पुतळ्यांभोवती काटेकोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हेही दाखल केले आहेत.

कुठे आहे हा पुतळा?

तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहराच्या सीमेवर तेल्लापूर येथे ‘गदर’ नावाचं एक जंक्शन आहे.

‘गदर’ हे क्रांताकारी लोकगायक होते. स्वतंत्र तेलंगणा करण्यासाठीच्या चळवळीत शाहीर गदर यांनी आपल्या गाण्यांच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावली होती.

या गदर जंक्शनमध्ये सरकारच्या परवानगीने गदर यांचा पुतळा बसवण्यात आला आहे.

त्यांच्या पुतळ्यासमोरील चौकात इतर पुतळे बसवण्यासाठी अनेक प्रस्ताव होते.

गदर यांच्या पुतळ्यासमोरील चौकात इतर पुतळे बसवण्यासाठी अनेक प्रस्ताव होते.

त्यावर चर्चाही झाली. परंतु, गदर यांच्या पुतळ्याशिवाय इतर कोणत्याही प्रस्तावाला अद्याप अधिकृत मान्यता मिळाली नाहीये.

त्यातच अलीकडेच तेल्लापूरची नगरपालिका ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेत विलीन झाली आहे.

या पार्श्वभूमीवर, 25 जानेवारी 2026 रोजी काही व्यक्तींनी त्या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. नंतर, 6 फेब्रुवारी रोजी इतर काही जणांनी तिथे महात्मा फुले यांचाही पुतळा बसवला.

हाच पुतळा स्थापन करत असताना ही घटना घडली आहे.

पुतळा बसवताना नेमकं काय घडलं?

महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या स्थापनेदरम्यान किरकोळ हाणामारी झाली आहे.

काही लोकांनी नवीन बसवलेल्या पुतळ्याला हटवण्याचा देखील प्रयत्न केला.

याच पुतळा हटवण्याच्या प्रयत्नाचा व्हीडिओ देशभर व्हायरल झाला असून त्यामुळे महात्मा फुले यांना मानणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला आहे.

'गदर' हे क्रांताकारी लोकगायक होते. स्वतंत्र तेलंगणा करण्यासाठीच्या चळवळीत शाहीर गदर यांनी आपल्या गाण्यांच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावली होती.

“महात्मा फुले यांच्या पुतळ्याचं नुकसान करण्यासाठी दगडफेक करण्यात आली. त्यांनी पुतळ्याला लाथा मारल्या. तसेच, ज्या पायावर हा पुतळा उभा करण्यात आलाय, तो पायाच उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला,” असा आरोप बसपा नेते संजीव आणि कवली संजीव यांनी बीबीसीशी बोलताना केला.

पुढे त्यांनी असाही आरोप केला की, “फुले पुतळा हटवण्याचा हा प्रयत्न संघ परिवारातील सदस्यांनीच केला आहे.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आरोपांवर काय म्हटलं?

या आरोपांबाबत, बीबीसीने पाटणचेरू भागातील बजरंग दलाचे नेते मनोज यांच्याशी संपर्क साधला.

मात्र, त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद येऊ शकलेला नाहीये.

मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या प्रकरणी आपली भूमिका विशद केली आहे.

‘संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यावरील हल्ल्यात त्यांचा कोणताही सहभाग नसल्याचं’ संघानं स्पष्ट केलेलं आहे.

महात्मा फुले यांचा पुतळा

‘काही लोकांनी ग्रामस्थांमध्ये संघर्ष निर्माण करण्यासाठी आणि संघाला खोटेपणानं बदनाम करण्यासाठी जाणूनबुजून पुतळ्याची तोडफोड केली असल्याचं’ संघानं म्हटलं आहे.

‘महात्मा फुले यांच्यासारख्या समाजसुधारकांबद्दल संघाला खूप आदर आहे आणि अशा प्रकारच्या कटांपासून सावध राहण्याचं आवाहन आम्ही जनतेला केलं आहे,’ असं प्रादेशिक प्रचार प्रमुख राजगोपाल यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

बसपाचे नेते संजीव म्हणाले की, “या वादात सहभागी असलेले दोन्ही गट मागास वर्गातूनच येतात. तेही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतात. परंतु, महात्मा फुले पुतळा हटवण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र स्वीकारण्याजोगा नाही, हे निषेधार्ह आहे.”

पोलिसांनी काय सांगितलं?

कोल्लूर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर गणेश पटेल यांनी बीबीसीला सांगितलं की, या घटनेसंदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

“परवानगीशिवाय पुतळे बसवल्यामुळे जीएचएमसी अधिकाऱ्यांनी एक गुन्हा दाखल केला. तर, तिथे झालेल्या संघर्षाबाबत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्हीही प्रकरणात प्रत्येकी नऊ जणांवर आरोप दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर, पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे,” असंही ते म्हणाले.

कोल्लूर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर गणेश पटेल यांनी बीबीसीला सांगितलं की, या घटनेसंदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्यांनी पुढं सांगितलं की, ज्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला त्यांना त्याभोवती एक पाया बांधायचा होता. परंतु, महात्मा फुले यांचा पुतळा जवळच स्थापन केल्यानंतर त्यांनी तो उखडून काढण्याचा प्रयत्न केला असल्याचं दिसून येतंय. यामागची नेमकी कारणे तपासानंतरच स्पष्ट होतील, असंही त्यांनी सांगितलं.

तेलंगणामध्ये यापूर्वीही शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या स्थापनेवरून वाद झाले आहेत.

छगन भुजबळ काय म्हणाले?

त्यांनी म्हटलंय की, “या हीन कृत्याचा आणि यात सहभागी समाजकंटकांचा मी तीव्र निषेध करतो. ही फक्त जोतिबांच्या पुतळ्याची विटंबना नाही, तर आपल्या सामाजिक विचारांवर आणि समतेच्या मूल्यांवर केलेला आघात आहे.”

महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या सोशल मीडियावर यासंदर्भात निषेध व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

फोटो स्रोत, Facebook/Chhagan Bhujbal

पुढे त्यांनी म्हटलंय की, “या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मी तात्काळ केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री. अमित शाह जी यांच्याकडे निवेदनाद्वारे या गुन्ह्यातील दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.”

“ज्या ठिकाणी ही विटंबना झाली, तिथेच महात्मा फुले यांचा भव्य पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक स्थापित करून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचीही विनंती केली आहे. जोतिबांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. सामाजिक न्याय आणि घटनात्मक मूल्यांच्या रक्षणासाठी या प्रकरणाची गंभीर दखल तेलंगणा सरकारनेही घेतली पाहिजे.”

प्रकाश आंबेडकरांनी नोंदवला निषेध

त्यांनी म्हटलंय की, “हा केवळ जोतिबा फुलेंवर हल्ला नाही तर दलित, आदिवासी आणि ओबीसींवरही हल्ला आहे. हा सामाजिक न्यायावर हल्ला आहे. हा उपेक्षित आणि बहुजन समुदायाच्या समानतेच्या चळवळीवर केलेला हल्ला आहे.”

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

फोटो स्रोत, Facebook/Balasaheb Ambedkar

“आरएसएस महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या विचारसरणीचा द्वेष करते. आरएसएस बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या विचारसरणीचा द्वेष करते.”

“आपला देश फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारसरणीने चालवला जाईल, मनुवादाने नाही,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC