Source :- BBC INDIA NEWS

भारतानं अडवलं पाकिस्तानचं पाणी, बगलिहार धरण का आहे महत्त्वाचं?
3 तासांपूर्वी
भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर सलाल आणि बगलिहार धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. परिणामी चिनाब नदीच्या पाण्याचा प्रवाह आटलाय.
चिनाब नदीवर बांधण्यात आलेलं बगलिहार धरण भारत – पाकिस्तान संबंधांमध्ये धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाचं का आहे? आणि भारतात असणाऱ्या या धरणातून किती पाणी सोडलं जातं याकडे पाकिस्तानचं लक्ष का आहे? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
लेखन : अमृता दुर्वे
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : अरविंद पारेकर
SOURCE : BBC