Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, AFP via Getty Images
2 तासांपूर्वी
ICC T-20 वर्ल्ड कपला शनिवारी (7 फेब्रुवारी) सुरुवात झाली. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने अमेरिकेला 29 रनांनी हरवले.
कमकुवत समजल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या संघाविरोधात भारताची स्थिती काही काळासाठी फारशी चांगली नव्हती.
टॉस जिंकल्यावर अमेरिकेनी पहिले फील्डिंग घेतली. भारतीय बॅट्समनचे प्रदर्शन पाहून असे वाटत होते की त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे. सामन्याच्या पहिल्या बॉलवरच अभिषेक शर्माची विकेट उडाली. मग थोड्या थोड्या वेळात भारताने विकेट्स गमवल्या. कॅप्टन सूर्यकुमार यादवने एक बाजू सांभाळत 84 रनांची जबाबदार इनिंग्स खेळली.
पाकिस्तानचा देखील शनिवारी पहिला सामना होता. पाकिस्तानने नेदरलँडसला हरवले. परंतु पाकिस्तानने धडपडतच हा सामना जिंकला त्याची देखील चर्चा चांगलीच रंगली.
कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या शानदार खेळीचं कौतुक
पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स हा सामना श्रीलंकेत झाला. तीन बॉल बाकी असताना पाकिस्तानने नेदरलँड्सला तीन विकेट्सनी हरवले.
भारत आणि पाकिस्तानच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दोन्ही संघ आपल्या विरोधी संघाविरोधात जिंकले परंतु, त्यांचं प्रदर्शन जसं हवं तसं झालं नाही. तुलनेनी कमकुवत समजल्या जाणाऱ्या संघाविरोधात दोन्ही संघ अडखळत खेळले, त्यामुळे क्रिकेट रसिकांमध्ये या दोन्ही संघाच्या प्रदर्शनाची चर्चा चांगलीच रंगलेली दिसत आहे.
पाकिस्तानमध्ये कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या शानदार खेळीचं कौतुक होताना दिसत आहे. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंचं म्हणणं आहे की सूर्यकुमारला जी जबाबदारी देण्यात आली होती ती त्याने समर्थपणाने पेलल्याचं सिद्ध केलं आहे. त्याचं काम अगदी त्या अनुरूपच आहे.
पाकिस्तानच्या संघातील माजी क्रिकेटपटू सलमान बटने टीव्हीवरील चर्चेदरम्यान भारतीय टी-20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या फॉर्मचं कौतुक केलं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
सलमान बटने म्हटले, एक वेळ अशी होती की 77 धावांवर भारताचे सहा बॅट्समन आऊट झाले होती. त्यामुळे मोठी समस्या उद्भवली होती. त्यानंतर सूर्यकुमारने हा डाव बऱ्याच प्रमाणात सावरला. गेले सहा ते आठ महिने सूर्यकुमारसाठी खडतर होते परंतु त्याला अगदी वेळेवर सूर गवसला आणि त्याने जोरदार पुनरागमन केले आहे.
सलमान बटने दोन्ही संघाच्या खेळाबद्दल बोलताना म्हटले की “शनिवारी सकाळी पाकिस्तानची आधी स्थिती चांगली होती पण नंतर ते वाईट स्थितीत अडकले. तर भारताची स्थिती आधी गंभीर होती आणि नंतर ते सावरले. मोठ्या संघात आणि कमकुवत संघात हाच फरक असतो की एका जरी खेळाडूने चांगलं प्रदर्शन केलं तर विरोधी टीमवर तो भारी पडू शकतो.”
माजी क्रिकेटर बासित अलीने म्हटले की “सूर्यकुमारने 36 बॉलमध्ये अर्धशतक लगावले. त्यानंतर त्याने खेळात बदल केला आणि जोरदार फटकेबाजी केली. जितकेही सिक्स मारले ते बॉल ऑफ स्टम्प वाईड होते. सूर्यकुमारचं होम ग्राउंड असल्याचा त्याला फायदा झाला. स्टेडियमचे सर्व बारकावे त्याला ठाऊक आहेत, या ठिकाणी तो भरपूर खेळला आहे. हे त्याचं होम ग्राउंड आहे पण त्याने परिस्थिती चांगली हाताळली.”
‘सर्व श्रेय सूर्यकुमार यादवलाच जातं’
बासित अलीने पुढे म्हटले की एका बाजूला विकेट्स पडत होत्या आणि दुसऱ्या बाजूला सूर्यकुमारने डाव सांभाळला. तो खूप चांगलं खेळला. नाबाद 84 रन. मला वाटलं भारत 130-135 दरम्यान राहील. पण याचे सर्व श्रेय सूर्यकुमार यादवलाच जातं. तोच प्लेअर ऑफ द मॅच ही बनला.
भारताने अमेरिकेविरोधात 161 रन केले होते. हे आव्हान अमेरिकेला पेलले नाही. अमेरिकेने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 132 रन्स केले.
सूर्यकुमार यादवच्या चांगल्या प्रदर्शनाचे श्रेय पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सकलेन मुश्ताकने भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीर याला दिले आहे.
फोटो स्रोत, AFP via Getty Images
सकलेन मुश्ताकने म्हटले की, मॅनेजमेंटला आपल्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे. या ठिकाणी आपण गौतम गंभीरला श्रेय द्यायला हवे, कारण त्यांनीच निवडकर्त्यांना हा विश्वास दिला. ज्या वेळी सूर्यकुमारचा फॉर्म व्यवस्थित नव्हता तरी देखील व्यवस्थापनाने सूर्यकुमारवर विश्वास ठेवला. मॅनेजमेंटला हे ठाऊक होते ही त्याची भूमिका आहे आणि त्याने ती सिद्ध केली.
सकलेन मुश्ताकने पुढे म्हटले की क्रिकेट रसिकांना असं वाटत होतं की भारत अमेरिकेविरोधात 200 रन्स बनवेल. ही तीच टीम आहे जी दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाविरोधातही 200 बनवते.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफीजने म्हटले आहे की जेव्हापासून सूर्यकुमार यादव टीममध्ये आला आहे तेव्हापासून त्याची मोठ्या प्रमाणात छाप आहे. ज्या वेळी सूर्यकुमार आऊट ऑफ फॉर्म होता तरी देखील व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास ठेवला. अयशस्वी होऊनही तो चौथ्या क्रमांकावर खेळत राहिला. त्याच्यासाठी एक जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे आणि तो ते डिलिव्हर करत आहे.
मुंबईचं असं पिच याआधी कधी पाहिलं नव्हतं
बासित अलीचं म्हणणं आहे की मुंबईचं असं पिच याआधी कधी पाहिलं नव्हतं.
या मॅचबद्दल बोलताना बासित अलीने आपल्या युट्युब चॅनेलवर म्हटले आहे की “भारत आणि अमेरिकेत असा मॅच होईल असं वाटलं नव्हतं. मुंबईच या सारखं पिच मी आधी कधी पाहिलं नव्हतं. बॉल बाऊन्स देखील होत होता, त्याला ब्रेकही मिळत होता आणि ग्रिप देखील होती.”
अमेरिकेनी टॉस जिंकून भारताला बॅटिंग दिली. सहा ओव्हरमध्ये 46 रन झाले आणि चार विकेट पडल्या. 77 वर तर सहा विकेट पडल्या होत्या. असं वाटत होतं की स्कोअर 130-135 होईल, पण स्कोअर 161 वर पोहोचला.
फोटो स्रोत, AFP via Getty Images
त्याने पुढे म्हटलं की टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या दिवसाची ही विशेषतः होती की कमकुवत समजल्या जाणाऱ्या संघांनी ( नेदरलँड, अमेरिका आणि स्कॉटलँड) ने प्रतिस्पर्धी संघाला 200च्या वर जाऊ दिले नाही.
बासित अलीने म्हटले की अमेरिकेनी भारताच्या 77 रनांवर सहा विकेट घेतल्या. अमेरिकेचा पुढचा सामना पाकिस्तानविरोधात होणार आहे. ही तीच टीम आहे, ज्यामुळे गेल्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला मालिकेबाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
त्याचं म्हणणं आहे की नेदरलँड्सने पाकिस्तानविरोधात जिंकता जिंकता मॅच हारली. कॅच सोडल्यामुळे हातातील सामना त्यांना गमवावा लागला.
नेदरलँडविरोधात ते भलेही जिंकले पण पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू पाकिस्तानच्या संघावर नाराज आहेत.
फोटो स्रोत, AFP via Getty Images
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने म्हटलं की पाकिस्तानचा पहिल्या दिवशी अंधारात नेम लागला. पाकिस्तानच्या यशामागे नशीबाची साथ होती असं अकमलने म्हटले.
‘द गेम प्लॅन’ चॅनलवरील मुलाखतीत अकमल म्हणाला, “फहीम अशरफने 11 चेंडूत 29 धावा केल्या. ही एक उत्तम कामगिरी होती.”
असं असलं तरी, पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनावर त्यांच्या खेळाडूंच्या क्रमवारीवरून टीका झाली आहे. शनिवारी झालेल्या सामन्यातही हे पुन्हा एकदा दिसून आले.
कामरान अकमल आणि बासित अली दोघांनीही म्हटले की, संघात हे कळत नाही की, कोणत्या फलंदाजाला आणि कोणत्या गोलंदाजाला कधी मैदानात उतरवायचे.
बासित अली म्हणाला, “जर एखाद्या संघाला कसे खेळायचे, आपले लक्ष्य काय आहे आणि प्रत्येक गोलंदाजाचे वैशिष्ट्य काय आहे हे माहीत नसेल, तर तो संघ असाच खेळेल आणि हीच अवस्था होईल.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC



