Home world news marathi भयंकर! कॅनडातील शाळेत अंदाधुंद गोळीबार; 10 जणांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी

भयंकर! कॅनडातील शाळेत अंदाधुंद गोळीबार; 10 जणांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी

11
0

Source :- ZEE NEWS

Canada- Indiscriminate Firing In School: कॅनडामधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. एका शाळेत अंदाधूंद गोळीबार होऊन 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर तब्बल 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा गोळीबार गेल्या काही दशकांमधील सर्वात भीषण गोळीबार आहे असे मानले जात आहे. काय आहे ही संपूर्ण घटना जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

गोळीबारात 10 जणांचा मृत्यू

कॅनडामध्ये घडलेली, हृदयाचा थरकाप उडवणारी ही घटना मंगळवारी (10 फेब्रुवारी 2026) घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात शाळेतील 6 जणांचा मृत्यू झाला असून, रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच आणखी दोघांचा मृत्यू झाला. तर स्थानिक समुदायातील एका निवासस्थानी आणखी दोघं मृतावस्थेत आढळले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना हेलिकॉप्टरच्या मदतीने इस्पितळात पोहोचवण्यात आले. अधिक माहितीनुसार, शाळेतून कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह सुमारे 100 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळाले. 

कधी घडली घटना? 

रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांच्या निवेदनानुसार, ही घटाना टम्बलर रिज सेकेंडरी स्कूल या ठिकाणी, स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान घडली. यानंतर टम्बलर रिज पोलीसांनी त्या भागात दुपारी 2 वाजेपर्यंत धोक्याचा इशारा देत अलर्ट जारी केला. तेथिस रहिवाशांना दरवाजे आणि खिडक्या बंद करून घरामध्येच सुरक्षित जागी थांबण्याचा आदेश दिला गेला. काही काळाने परिस्थिती आटोक्यात आल्या नंतर 5 तासांनी हा अलर्ट हटवण्यात आला. 

पोलिसांना घटनेतील संशयितांची ओळख पटवण्यात यश 

घटनेच्या तपासादरम्यान, पोलीसांना गोळीबारात सामील असलेल्या संशयीताची ओळख पटवण्यात यश आले, जी एक तपकिरी केसांचा पोशाख घातलेली महिला आहे. असेही सांगण्यात येत आहे की, ही महिला शाळेच्या आवारात मृतावस्थेत आढळली. तिने स्वतःलाच जखमी केले आहे असे मानले जात आहे. दरम्यान या गोळीबाराचे कारण अद्याप समोर आले नसून, या घटनेत दुसरा संशयित सहभागी आहे का याचा तपास पोलीसांकडून केला जात आहे. तसेच शहराची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी शेजारच्या भागातून अतिरिक्त पोलीस तैनात केले जात आहेत.

स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण 

टम्बलर रिज हे शहर अमेरिकेच्या सीमेपासून सुमारे 680 किलोमीटर अंतरावर पश्चिम कॅनडातील रॉकी पर्वतांच्या पायथ्याशी वसलेले आहे. सुमारे 2,400 लोकसंख्या असलेल्या या शहरात बंदुकीचे अमेरिकेपेक्षाही कडक कायदे आहेत. तरी सुद्धा अशी धक्कादायक घटना घडल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

SOURCE : ZEE NEWS