Home world news marathi पाकिस्तानातच आहे पाकिस्तानचा सर्वात मोठा दुश्मन! 44 टक्के पाकिस्तान यांच्याच ताब्यात

पाकिस्तानातच आहे पाकिस्तानचा सर्वात मोठा दुश्मन! 44 टक्के पाकिस्तान यांच्याच ताब्यात

8
0

Source :- ZEE NEWS

Balochistan History: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. भारताने पाकिस्तानला चांगलाच दम भरला. भारत पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करण्याची तयारी करत आहे. मात्र,  पाकिस्तानातच आहे पाकिस्तानचा सर्वात मोठा दुश्मन. पाकिस्तान 44 टक्के भाग यांच्याच ताब्यात आहे. जाणून घेऊया पाकिस्तानचा हा सर्वात मोठा शत्रू आहे करी कोण?

पाकिस्तानाचा सर्वात मोटा शत्रू दुसरा तिसरा कोणी नसून बलुची बंडखोर आहेत. मार्च 2025 मध्ये बलुची बंडखोरांनी पाकिस्तानची एक रेल्वे हायजॅक केली. अपहरणकर्ते बलुची बंडखोरांच्या खात्म्याने त्याची सांगता झाली . मात्र, बलुचिस्तानची भळभळती जखम पुन्हा अधोरेखित झाली. भारत विविध मार्गाने पाकिस्तानची कोंडी करत आहे. अशातच पाकिस्तानात असलेल्या बलुची बंडखोरांनी भारताची साथ पाकिस्तानची वाट अडवली तर पाकिस्तानला आणखी भारी पडू शकते.

कोण आहेत पाकिस्तानवर कुरघोडी करणारे बलुची बंडखोर?

बलुची बंडखोर कसे निर्माण झाले हे जाणून घ्यायचे असेल तर 77 वर्ष जुना इतिहास जाणून घ्यावा लागेल. 77 वर्षांपूर्वी फक्त 227 दिवस स्वतंत्र बलुचिस्तान अस्तित्वात होता. भारताच्या फाळणीनंतर, कलात राज्य म्हणजेच बलुचिस्तान सुमारे 227  दिवस स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य राहिले. बलुचिस्तानला पाकिस्तानात सामील व्हायचे नव्हते आणि पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिनाही याच्याशी सहमत होते. सध्याचा बलुचिस्तान तीन देशांमध्ये विभागलेला आहे. यामध्ये पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत, इराणचा सिस्तान-बलुचिस्तान प्रांत आणि अफगाणिस्तानमधील एक छोटासा भाग समाविष्ट आहे. पाकिस्तानने बलुचिस्तानमधील ग्वादर बंदर चीनला दिले आहे आणि स्थानिक बलुच लोक त्याचा निषेध करत आहेत. अफगाणिस्तानात, निमरुझ, हेलमंड आणि कंधार हे बलुचिस्तानचा भाग राहिले आहेत. बलुच हे सुन्नी मुस्लिम आहेत. शियाबहुल इराणच्या बलुचिस्तानमध्येही, बलुच सुन्नी मुस्लिम आहेत.

पाकिस्तान सरकार विरुद्ध बलुची बंडखोर असा हा संघर्ष आहे. पंजाब, सिंध तसेच खैबर पख्तुनवा प्रांतांच्या तुलनेत मिळणारी कमीपणाची वागणूक, विकास प्रकल्प तसेच रोजगाराची वानवा असे अनेक प्रश्न घेऊन बलुची बंडखोर लढत आहेत. मात्र प्रत्येक वेळी पाकिस्तान सरकार त्यांचं बंड मोडून काढण्यासाठी सज्ज असतं. बलुची बंडखोर त्याला बलुचिस्तानची गळचेपी किंवा पाकिस्तानची दडपशाही समजतात.

क्षेत्रफळानुसार बलुचिस्तान हे  पाकिस्तानचे सर्वात मोठे राज्य आहे, जे देशाच्या अंदाजे 44 टक्के क्षेत्र व्यापते. सर्वात मोठे राज्य असूनही, त्याची लोकसंख्या फक्त 1.5 कोटी आहे. पाकिस्तानमध्ये सोने, तांबे, तेल आणि इतर अनेक मौल्यवान धातुंच्या खाणी बलुचिस्तानमध्ये आहेत. तरीदेखील बलुचिस्तान हे सर्वात मागास राज्यांपैकी एक आहे.  पुन्हा एकदा स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी केली जात आहे. भारताने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत करावी अशी बलुचिस्तानची अपेक्षा आहे. 

SOURCE : ZEE NEWS