Home world news marathi जगातील सर्वात सुंदर महिला; संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात; कधी आणि...

जगातील सर्वात सुंदर महिला; संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात; कधी आणि का? कारण एकदम शॉकिंग

6
0

Source :- ZEE NEWS

Himba Tribe of Namibia:  जगभरात अनेक जाती जमातीचे लोक राहतात. या जाती जमातीचे लोक विशिष्ट रुढी परंपरा यांचे रालन करतात.  आधुनिकतेच्या युगात अनेक जमातीचे लोक आपल्या परंपरांचे  अस्तित्व गमावत आहेत.  परंतु आदिवासी समाज अजूनही आपल्या प्राचीन परंपरांचे पालन करत आहे. जगात अशीच एक आदिवासी जमात आहे. या समाजातील महिला संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात. तीही देखील या महिला जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून ओळखल्या जातात. जाणून घेऊया या महिला कोणत्या जामातीच्या आहेत. 

आफ्रिकन खंडातील उत्तर नामिबियामध्ये राहणाऱ्या हिम्बा जमातीच्या महिला आयुष्यात एकदाच अंघोळ करतात.  या जमातीच्या महिलांना पाण्यात स्नान करण्यास मनाई आहे. असे असूनही, त्यांचे शरीर घाणेरडे राहत नाही तर स्वच्छ राहते. यासाठी आदिवासी महिला एका विशेष प्रकारचे स्नान करतात. त्या धुराने स्नान करतात.  हिंबा ही एक अर्ध-भटक्या जमात आहे. उत्तर नामिबियामध्ये त्यांची एकूण लोकसंख्या सुमारे 50 हजार आहे. या जमातीचे लोक पर्यावरणाची पूजा करतात, म्हणून त्यांचे पर्यावरणाशी एक विशेष नाते आहे. शिकारीव्यतिरिक्त, हिंबा जमातीच्या लोकांनी आता शेती आणि पशुपालन सुरू केले आहे. हिंबा लोक त्यांच्या लाल गेरूच्या कातडीसाठी आणि अद्वितीय दागिन्यांसाठी तसेच त्यांच्या खोल सांस्कृतिक परंपरा आणि श्रद्धांसाठी ओळखले जातात. 

या महिला पाण्याऐवजी इतर नैसर्गिक पद्धतींनी त्यांचे शरीर स्वच्छ ठेवतात. खरं तर, हिंबा जमातीच्या महिला आणि पुरुष स्वतःला जंतू आणि बॅक्टेरियापासून मुक्त ठेवण्यासाठी धुराने आंघोळ करतात. महिला पाण्यात विशेष औषधी वनस्पती उकळतात आणि त्यातून निघणाऱ्या वाफेचा वापर करून त्यांचे शरीर स्वच्छ ठेवतात. यामुळे त्यांच्या शरीराला वास येत नाही. स्टीम बाथमुळे पाण्याची बचत देखील होते. हिंबा जमातीच्या महिला त्यांच्या त्वचेचे सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी एक विशेष लोशन देखील लावतात. हे लोशन प्राण्यांच्या चरबी आणि एका विशेष खनिज हेमॅटाइटपासून बनवले जाते.

पाण्याऐवजी धुराने आंघोळ करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. वाळवंटी हवामानात पाणी वाचवण्यासाठी ही परंपरा अत्यंत उपयुक्त आहे. हिंबा महिला आफ्रिकेतील सर्वात सुंदर मानल्या जातात. हिंबा जमातीमध्ये, बाळाच्या जन्मानंतर त्याची जन्मतारीख विचारात घेतली जात नाही, तर ज्या दिवशी स्त्री बाळाबद्दल विचार करू लागते, त्याच दिवसापासून बाळाचा जन्म झाला असे मानले जाते. आई होण्यासाठी, जमातीतील महिलांना मुलांशी संबंधित गाणी ऐकावी लागतात. या जमातीतील महिला  त्यांच्या लग्नाच्या दिवशी आयुष्यात फक्त एकदाच पाण्यात स्नान करतात. ही हजारो वर्षांची परंपरा आहे. 

SOURCE : ZEE NEWS