Home LATEST NEWS ताजी बातमी ‘घरभाडं द्यायला पैसे नाही म्हणून पत्नी-मुलीवर बलात्कार करण्याची संमती’, पोलीस तक्रारीत नेमकं...

‘घरभाडं द्यायला पैसे नाही म्हणून पत्नी-मुलीवर बलात्कार करण्याची संमती’, पोलीस तक्रारीत नेमकं काय म्हटलं?

15
0

Source :- BBC INDIA NEWS

मोरबीचे डीवायएसपी जे. एम. आल

फोटो स्रोत, Sachin Pithva

Published 1 तासापूर्वी

वाचन वेळ: 3 मिनिटे

(इशारा: या लेखातील काही गोष्टी तुम्हाला विचलित करू शकतात.)

गुजरातमधील मोरबीमध्ये एका व्यक्तीनं त्याच्याकडे घरभाडं भरण्यास पैसे नसल्यामुळे त्याच्या घरमालकाबरोबर एक ‘डील’ केल्याची पोलीस तक्रार दाखल झाली. त्यानुसार त्या घरमालकाला त्या व्यक्तीच्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करता येणार होता. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे.

या प्रकरणात ‘सिटी-ए डिव्हिजन’ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. एक 13 वर्षांची अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईवर त्या राहत असलेल्या घराच्या घरमालकानं ‘वारंवार बलात्कार’ केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ‘हे संपूर्ण कृत्य त्या सर्व्हायवर महिलेचा पती आणि त्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या संमतीनं घडलं होतं’.

पोलिसांनी या प्रकरणात, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट (पॉक्सो) या कायद्यासह कठोर कायदेशीर तरतुदींअंतर्गत गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात सर्व्हायवर महिलेच्या आईनं पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून ते पुढील कारवाई करत आहेत.

या प्रकरणात मोरबी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सुरेंद्रनगर येथून एक कुटुंब काही महिन्यांपूर्वी उपजीविकेच्या शोधात मोरबी इथं स्थलांतरित झालं होतं.

त्यांना एके ठिकाणी दरमहा 2 हजार रुपये घरभाड्यावर राहण्यास जागा मिळाली. मात्र ते कुटुंब आर्थिक अडचणीत होतं. त्यामुळे त्यांचं 4 महिन्यांचं घरभाडं थकीत झालं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मग त्या स्थलांतरित व्यक्तीनं घरमालकाशी एक ‘डील’ केली. थकित घरभाड्याच्या बदल्यात ‘त्यानं त्याच्या पत्नीवर आणि मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यास संमती दिली’.

घरभाडं दिलं नाही म्हणून पत्नी आणि मुलीवर घरमालकानं केला 'बलात्कार'

फोटो स्रोत, Sachin Pithva

मोरबी सिटी-ए डिव्हिजन पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, “आरोपी घरमालकानं पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला. तसंच त्या पीडित महिलेच्या पतीनं त्या पीडित महिलेच्या मुलीवरदेखील लैंगिक अत्याचार करण्यास संमती दिली होती.”

त्या भाडेकरूच्या पत्नीच्या आईला जेव्हा या घटनेबद्दल समजलं तेव्हा तिनं मोरबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट (पॉक्सो) या कायद्यासह कठोर कायदेशीर तरतुदींअंतर्गत गुन्हा दाखल केला.

मोरबी पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी पती आणि घरमालक यांना या गुन्ह्यात अटक केली आहे.

यापैकी आरोपी पती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर पोलिसांनी आरोपी घरमालकाची 1 दिवसाची पोलीस कोठडी (रिमांड) मिळवली आहे. पोलीस त्याची पुढील चौकशी करत आहेत.

पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणातील आणखी एक सह-आरोपी फरार आहे. तांत्रिक माहिती आणि खासगी खबऱ्यांच्या मदतीनं त्याचा शोध घेतला जातो आहे.

घरभाडं दिलं नाही म्हणून पत्नी आणि मुलीवर घरमालकानं केला 'बलात्कार'

फोटो स्रोत, Sachin Pithva

मोरबीचे डीवायएसपी जे. एम. आल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, “6 महिन्यांपूर्वी मोरबी-ए डिव्हिजनच्या परिसरात बलात्काराची एक घटना घडली होती. त्यामध्ये बाहेरून कामासाठी आलेला एक मजूर भाड्यानं राहत होता. घरमालक त्यांच्यासोबत राहत होता.”

“या प्रकरणातील तक्रारदारानं, तिचा जावई (मुलीचा पती), त्या घराचा घरमालक आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारदार महिलेनं तिच्या मुलीवर आणि नातीवर तिच्या जावयाच्या संमतीनं बलात्कार झाल्याचा आरोप करत ही तक्रार दाखल केली होती,” अशी माहिती त्यांनी दिली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात एकूण 3 आरोपी आहेत. त्यापैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला जातो आहे.

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी किंवा तक्रारदार यांची ओळख आम्ही उघड केलेली नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC