Home LATEST NEWS ताजी बातमी आयपीएल 2026 : साई सुदर्शनचे अर्धशतक निष्फळ, राजस्थान रॉयल्सचा गुजरात टायटन्सवर 6...

आयपीएल 2026 : साई सुदर्शनचे अर्धशतक निष्फळ, राजस्थान रॉयल्सचा गुजरात टायटन्सवर 6 धावांनी विजय

9
0

Source :- BBC INDIA NEWS

साई सुदर्शनने 73 धावांची खेळी करूनही गुजरात टायटन्सला विजय मिळवता आला नाही (फाइल फोटो)

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/AFP via Getty Images

29 मार्च 2026

अपडेटेड 2 तासांपूर्वी

वाचन वेळ: 7 मिनिटे

गुजरात जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील रोमांचक आयपीएल सामना राजस्थान रॉयल्सने 6 धावांनी जिंकला.

आयपीएल 2026 मधील हा 9 वा सामना शुक्रवारी (4 एप्रिल) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगला होता.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला व गुजरात टायट्नसपुढे 8 विकेट्स गमावत 210 धावांचं लक्ष्य ठेवलं.

लक्ष्याचा पाठलाग करत गुजरात टायटन्सने चांगली फलंदाजी केली मात्र, राजस्थान रॉयल्सने त्यांना रोखून धरले. गुजरात टायटन्सला 8 विकेट्स गमावत 204 धावा करता आल्या.

राजस्थानसाठी सलामीचे फलंदाज यशस्वी जैस्वालने 36 धावांमध्ये 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर ध्रुव जुरेलने 42 चेंडूत 75 धावा केल्या. तर, वैभव सूर्यवंशीने 18 चेंडूत 31 धावांची खेळी केली.

गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने 44 चेंडूत 73 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कुमार कुशाग्रा (18),जॉस बटलर 26, ग्लेन फिलिप्स (3), तसेच वॉशिंग्टन सुंदर अवघ्या 4 धावांवर बाद झाला.

10 व्या षटकापर्यंत गुजरातने 100 धावांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, त्यानंतर डाव कोसळायला सुरुवात झाली. रवी बिश्नोईने 41 धावा देत 4 गडी बाद करत गुजरातच्या मधल्या फळीला खिंडार पाडले.

त्यानंतर 12 ते 15 व्या षटकादरम्यान सामन्याचे पारडे राजस्थानच्या दिशेने झुकू लागले आणि 8 गडी गमावत गुजरातचा डाव 204 धावांवर संपुष्टात आला.

या विजयासह राजस्थान रॉयल्सचा आयपीएलच्या या हंगामातील हा दुसरा विजय आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्सविरोधातील तिसरा सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला होता. तर, गुजरात टायटन्स दोन्ही सामने हरले आहेत.

दिल्लीच्या समीर रिझवीच्या तुफानापुढं मुंबईची दाणादाण, 6 विकेट राखून केला पराभव

ANI

फोटो स्रोत, ANI

आयपीएलच्या आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं मुंबई इंडियन्सचा सहा विकेट राखून पराभव केला.

दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीला मुंबईच्या फलंदाजांना आवर घातला. नंतर समीर रिझवीच्या तडाखेबाज फलंदाजीनं मुंबईचा पराभव निश्चित झाला.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 300 धावांचा टप्पा कोणता संघ ओलांडणार अशा चर्चा सुरुवातीपासूनच आहेत. एकापेक्षा एक तडाखेबाज फलंदाजांमुळं चाहतेही अशी आशा लावून आहेत.

आयपीएलच्या सर्व सामन्यांचे थोडक्यात निकाल आणि महत्त्वाचे अपडेट याठिकाणी तुम्ही वाचू शकता.

वैभवचा पहिल्याच सामन्यात तडाखा

युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने 27 मार्चला 15 वा जन्मदिवस साजरा केला. यानंतर 3 दिवसांनी इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या पहिल्या सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर वैभवनं केवळ 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं.

युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी

फोटो स्रोत, Getty Images

वैभवनं अशा खेळपट्टीवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला जेथे काही क्षणांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचे (सीएसके) फलंदाज धावा करण्यासाठी झगडत होते आणि सीएसकेचा संपूर्ण संघ 127 धावांवर सर्वबाद झाला होता.

मागील आयपीएल हंगामातही जयपूरमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध वैभवने 17 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले होते.

सोमवारी (30 मार्च) गुवाहाटीमध्ये त्याने स्वतःचाच आधीचा विक्रम मोडला. आणि आपल्या संघाच्या (राजस्थान रॉयल्स) विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. राजस्थान रॉयल्सने 47 चेंडू शिल्लक असताना 8 विकेटनं सामना जिंकला.

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात कोहलीची तुफान खेळी; RCB विजयी

शनिवारी संध्याकाळी, जेव्हा आयपीएलच्या चालू सिझनमध्ये बंगळूरुमध्ये हैदराबाद आणि आरसीबीचे संघ मैदानावर उतरले, तेव्हा हा सामना देखील स्पर्धेतील नेहमीच्या सामन्यांसारखाच होईल, असं वाटलं होतं.

पण जेव्हा हा सामना संपला, तेव्हा एक वेगळंच चित्र समोर आलं. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला क्रिकेटप्रेमींनी पुन्हा एकदा डोक्यावर घेतलं.

विराट कोहलीने 69 धावा नाबाद केल्या.

फोटो स्रोत, ANI

विराट कोहली त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सर्वोत्तम काळात होता, तेव्हा त्याचं ज्या प्रकारचं कौतुक व्हायचं तसंच कौतुक या सामन्यानंतर होताना दिसलं.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सहज विजय मिळवला.

विराट कोहलीने आरसीबीकडून डावाची सुरुवात केली. कोहलीने अवघ्या 38 चेंडूंमध्ये नाबाद 69 धावांची खेळी केली.

त्याच्या या खेळीमुळे हैदराबादने दिलेले 200 हून अधिक धावांचं आव्हान अगदीच सहजसाध्य झालं.

आयपीएलच्या 2026 च्या हंगामातील सगळ्या सामन्यांचे निकाल खाली देत आहोत.

सामना क्रमांक 01 – RCB vs SRH

स्पर्धेच्या शुभारंभाचा हा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एम चिन्नस्वामी मैदानावर झाला.

प्रथम फलंदाजी करत एसआरएचनं आरसीबीसमोर 202 धावांचं आव्हान ठेवलं. ईशान किशननं 38 चेंडूत तडाखेबाज 80 धावा केल्या. आरसीबीसाठी डफी आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

पण चेसमास्टर विराट कोहलीनं नेहमीप्रमाणं हे आव्हान अगदी सोपं करून दाखवलं. 69 धावांची नाबाद खेळी करत त्यानं 26 चेंडू शिल्लक ठेवत संघाला हा विजय मिळवून दिला.

पडिक्कलनं 26 चेंडूत 61 धावा करत विजय आणखी सोपा केला.

आयपीएल ट्रॉफी

फोटो स्रोत, Getty Images

सामना क्रमांक 02 – KKR vs MI

आयपीएलच्या या हंगामातील दुसरा सामना केकेआर आणि मुंबई इंडियन्समध्ये झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 6 विकेटनं विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करत केकेआरनं मुंबईसमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं. अजिंक्य रहाणेने 40 चेंडूत 67 धावा केल्या.

मुंबई इंडियने 6 विकेटने हा सामना जिंकला. रेयान रेकल्टनने 43 चेंडूत 81 धावा केल्या, तर रोहित शर्माने 38 चेंडूत 78 धावांची दमदार खेळी. तसेच मुंबईला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. मुंबईसाठी शार्दुल ठाकूरने 3 विकेट घेतल्या.

सामना क्रमांक 03 – CSK vs RR

युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने 27 मार्चला 15 वा जन्मदिवस साजरा केला. यानंतर 3 दिवसांनी इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या पहिल्या सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर वैभवनं केवळ 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं.

वैभवनं अशा खेळपट्टीवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला जेथे काही क्षणांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचे (सीएसके) फलंदाज धावा करण्यासाठी झगडत होते आणि सीएसकेचा संपूर्ण संघ 127 धावांवर सर्वबाद झाला होता.

मागील आयपीएल हंगामातही जयपूरमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध वैभवने 17 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले होते.

सोमवारी (30 मार्च) गुवाहाटीमध्ये त्याने स्वतःचाच आधीचा विक्रम मोडला. आणि आपल्या संघाच्या (राजस्थान रॉयल्स) विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. राजस्थान रॉयल्सने 47 चेंडू शिल्लक असताना 8 विकेटनं सामना जिंकला.

सामना क्रमांक 04 – GT vs KXIP

गुजरात टायटन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबच्या संघानं 3 विकेट राखून विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करत गुजरातच्या संघानं पंजाबसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यात शुभमन गिलच्या 39, जोस बटलरच्या 38 आणि ग्लेन फिलिप्सच्या 25 धावांचा समावेश होता.

पंजाबच्या विजयकुमारनं 3 विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात पंजाबच्या संघानं 3 विकेटनं सामना जिंकला. पण शेवटच्या ओव्हरपर्यंत त्यांना विजयासाठी प्रयत्न करावे लागले. कूपर कोनोलीच्या 44 चेंडूत 72 धावांच्या जोरावर पंजाबनं सहज विजय मिळवला.

कूपर कोनोरी 72 धावांच्या कामगिरीसाठी प्लेयर ऑफ द मॅच ठरला.

सामना क्रमांक 05 – LSG vs DC

आयपीएलच्या पाचव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं लखनऊ सुपर जायंट्सला 6 विकेट आणि 17 चेंडू राखून पराभूत केलं.

प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सचा संपूर्ण संघ 10 चेंडू शिल्लक असतानाच 141 धावांवर सर्वबाद झाला होता. अब्दुल समदनं 36 तर मिशेल मार्शनं 35 धावा केल्या.

दिल्लीच्या एनगिडी आणि नटराजन यांनी प्रत्येकी 3 तर कुलदीपनं दोन विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघानं 17 ओव्हरमध्येच आव्हान पूर्ण केलं. समीर रिझवीनं नाबाद 70 धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्जनं नाबाद 39 धावा केल्या.

समीर रिझवी प्लेयर ऑफ द मॅच ठरला.

सामना क्रमांक 06 – SRH vs KKR

कोलकात्याच्या इडन गार्डनच्या मैदानावर झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यात हैदराबादनं कोलकात्याला घरच्या मैदानावर धूळ चारली.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं त्यांची जमेची बाजू असलेल्या फलंदाजांच्या तडाखेबाज खेळींच्या जोरावर कोलकातासमोर 227 धावांचं आव्हान ठेवलं.

हेडनं 21 चेंडूत 46 तर अभिषेकनं 21 चेंडूत 48 धावा केल्या. क्लासेननं 35 चेंडूत अर्धशतकी 52 धावांची खेळी केली.

प्रत्युत्तरात कोलकाताचा संपूर्ण संघ 16 ओव्हरमध्ये 161 धावांवर बाद झाला. उनाडकटनं तीन तर इशान मलिंगा आणि रेड्डीनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

तडाखेबाज फलंदाजीमुळं SRH नं मिळवला 65 धावांनी विजय

फोटो स्रोत, ANI

सामना क्रमांक 07

चेन्नईला स्पर्धेतल्या सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. किंग्ज इलेव्हन पंजाबनं पाठलाग करताना विक्रमी विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून आयुष म्हात्रे शिवम दुबे यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईनं पंजाबला 210 धावांचं आव्हान दिलं होतं. म्हात्रेनं 73 तर दुबेनं त्यात 45 धावांचं योगदान दिलं. तर सरफराजनंही फटकेबाजी करत 35 धावा केल्या.

प्रत्युत्तरात पंजाबकडून प्रियांश आर्या, प्रभसिमरन, कूपर कोनोली आणि श्रेयस अय्यर यांनी पंंजाबला विक्रमी विजय मिळवून दिला.

प्रभसिमरननं 43 तर श्रेयस अय्यरनं 29 चेंडूत तडाखेबाज 50 धावा करत पंजाबला विजयापर्यंत पोहोचवलं. 11 चेंडूत 39 धावा करणारा प्रियांश आर्या प्लेयर ऑफ द मॅच ठरला.

सामना क्रमांक 08

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या या सामन्यात दिल्लीनं 6 विकेट राखून विजय मिळवला. टॉस जिंकत दिल्लीनं आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

सुरुवातीपासून धक्के देत त्यांनी मुंबईच्या फलंदाजांना आवर घातलेला पाहायला मिळालं. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 162 धावाच करता आल्या.

हार्दिकच्या अनुपस्थितीत कर्णधार असलेल्या सूर्यकुमार यादवनं 36 चेंडूत 51 तर रोहितनं 26 चेंडूत 35 धावा केल्या. मुकेश कुमारनं दोन विकेट घेतल्या.

पण प्रत्युत्तरात दिल्लीच्या निसंका आणि रिझवी यांच्यासमोर मुंबईच्या गोलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आली नाही. निसंकानं 30 चेंडूत 44 तर रिझवीनं 51 चेंडूत 90 धावा करत सामना दिल्लीला सहज विजय मिळवून दिला.

समीर रिझवी प्लेयर ऑफ द मॅच ठरला.

सामना क्रमांक 09

गुजरात जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील रोमांचक आयपीएल सामना राजस्थान रॉयल्सने 6 धावांनी जिंकला.

आयपीएल 2026 मधील हा 9 वा सामना शुक्रवारी (4 एप्रिल) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगला होता.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला व गुजरात टायट्नसपुढे 8 विकेट्स गमावत 210 धावांचं लक्ष्य ठेवलं.

लक्ष्याचा पाठलाग करत गुजरात टायटन्सने चांगली फलंदाजी केली मात्र, राजस्थान रॉयल्सने त्यांना रोखून धरले. गुजरात टायटन्सला 8 विकेट्स गमावत 204 धावा करता आल्या.

राजस्थानसाठी सलामीचे फलंदाज यशस्वी जैस्वालने 36 धावांमध्ये 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर ध्रुव जुरेलने 42 चेंडूत 75 धावा केल्या. तर, वैभव सूर्यवंशीने 18 चेंडूत 31 धावांची खेळी केली.

गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने 44 चेंडूत 73 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कुमार कुशाग्रा (18),जॉस बटलर 26, ग्लेन फिलिप्स (3), तसेच वॉशिंग्टन सुंदर अवघ्या 4 धावांवर बाद झाला.

10 व्या षटकापर्यंत गुजरातने 100 धावांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, त्यानंतर डाव कोसळायला सुरुवात झाली. रवी बिश्नोईने 41 धावा देत 4 गडी बाद करत गुजरातच्या मधल्या फळीला खिंडार पाडले.

त्यानंतर 12 ते 15 व्या षटकादरम्यान सामन्याचे पारडे राजस्थानच्या दिशेने झुकू लागले आणि 8 गडी गमावत गुजरातचा डाव 204 धावांवर संपुष्टात आला.

या विजयासह राजस्थान रॉयल्सचा आयपीएलच्या या हंगामातील हा दुसरा विजय आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्सविरोधातील तिसरा सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला होता. तर, गुजरात टायटन्स दोन्ही सामने हरले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC